६,६,६,६,६,६,६,६… एका षटकामध्ये कुटल्या तब्बल ५० धावा; ३९ षटकात केलं अर्थशतक अन् ४० व्यात शतक

क्रिकेटच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात वाईट ओव्हरपैकी एक या गोलंदाजाने टाकली ज्यामध्ये सहा चेंडूंबरोबर दोन नो बॉलही होते.

Cricket 6
एका षटकात केलं अर्थशतक पुढच्याच षटकात झालं शतक (प्रातिनिधिक फोटो सौजन्य ट्विटरवरुन साभार)

एक फलंदाज एका षटकामध्ये किती धावा करु शकतो? जर फलंदाजाने सर्वच्या सर्व सहा चेंडूंमध्ये सहा षटकार लगावले तर जास्तीत जास्त ३६ धावा त्याला करता येतील. मात्र ऑस्ट्रेलियामधील एका क्रिकेटपटून असं काही करुन दाखवलं आहे की त्याबद्दल वाचल्यावर तुम्हाला धक्काच बसेल. सोरेंटो डनक्रेगच्या सीनियर क्लबकडून खेळणाऱ्या सॅम हॅरिसनने हा पराक्रम करुन दाखवला आहे. सॅमने एका षटकामध्ये एक दोन किंवा सहा नाही तर तब्बल आठ षटकार लगावले आहेत.

सॅमने एका षटकामध्ये तब्बल ५० धावा केल्यात. नॅथन बेनेट या गोलंदाजाच्या षटकामध्ये सॅमने हा पराक्रम केलाय. नॅथनने क्रिकेटच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात वाईट ओव्हरपैकी एक ओव्हर टाकली. बेनेटच्या प्रत्येक चेंडूवर सॅमने षटकार लगावला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यामध्ये दोन नो बॉलही नॅथनने टाकले. त्यावरही सॅमने षटकार लगावल्याने त्याचा षटकारांचे ४८ आणि नो बॉलचे दोन अशा ५० धावा करता आल्या.

सामन्यातील ४० व्या षटकामध्ये हा प्रकार घडला. हा कारमाना करणाऱ्या सॅमने ३९ षटकामध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं होतं. त्यानंतर ४० व्या षटकात त्याने आपलं शतकं साजरं केलं.

कोणत्याही फलंदाजाने ३६ पेक्षा अधिक धावा एका षटकात केल्याची ही पहिली घटना नाहीय. न्यूझीलंडमधील एका प्रथम श्रेणी क्रिकेटच्या सामन्यामध्ये बर्ट वेंसने एका षटकामध्ये ७७ धावा दिल्या होत्या. हा एक विक्रम आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 8 sixes in one over batsman score 50 runs scsg

Next Story
विजयी भव !
ताज्या बातम्या