नेपाळमध्ये सुरु असलेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत, यजमान संघाने अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात नेपाळच्या महिला संघाने मालदीवचा संघ ११.३ षटकांत माघारी धाडला. मालदीवच्या सलामीवीरानं एक धाव केली आणि इतर नऊ फलंदाजांना या सामन्यात एकही धाव काढता आलेली नाही.

मालदीवने प्रथम फलंदाजी करताना, सलामीवीर ऐमा ऐशाथानं एक धाव काढली. यानंतरच्या सात धावा नेपाळच्या गोलंदाजांनी अतिरीक्त धावांच्या स्वरुपात दिल्या. मालदीवच्या इतर फलंदाज शून्यावर बाद झाल्या. अंजलीने ४ षटकांत अवघी १ धाव देत ४ विकेट घेतल्या. तिला सिता राणा मगर. रुबीने छेत्रीने २ तर सुमन खाटीवाडा आणि करुणा भंडारी यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

नेपाळने आपल्याला मिळालेलं ९ धावांचं लक्ष्य ७ चेंडूत पार केलं. काजल श्रेष्ठा आणि रोमा थापा या जोडीने नेपाळला हा विजय मिळवून दिला.