scorecardresearch

IPL च्या नवीन हंगामाची तयारी सुरु, नवव्या संघासाठी अदानी ग्रुप शर्यतीत

चौदाव्या हंगामात नववा संघ प्रेक्षकांच्या भेटीला येण्याचे संकेत

भारतात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन युएईत केलं. १० नोव्हेंबरला या तेराव्या हंगामाचा अंतिम सामना पार पडला, ज्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर ५ गडी राखून मात करत सलग दुसऱ्यांना स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं. तेरावा हंगाम संपल्यानंतर बीसीसीआयने लगेचच पुढील हंगामाची तयारी सुरु केली आहे. २०२१ मध्ये एप्रिल-मे महिन्यात भारतातच स्पर्धेचं आयोजन करण्याचे बीसीसीआयचे प्रयत्न असल्याचं अध्यक्ष सौरव गांगुलीने स्पष्ट केलंय. इतकच नव्हे तर पुढील हंगामासाठी नववा संघ मैदानात उतरवण्याचीही बीसीसीआयची तयारी आहे.

अद्याप याबाबत बीसीसीआयने अधिकृत माहिती दिली नसली तरीही मुंबई मिरर वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, अदानी ग्रुप आणि संजीव गोएंका ग्रुप नवव्या संघासाठी बोली लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संजीव गोएंका यांना नवव्या संघाचे मालकी हक्क मिळाले तर त्यांचं ते पुनरागमन ठरु शकतं. २०१६-१७ सालात पुणे सुपरजाएंट संघाचे संजीव गोएंका मालक होते. २०१७ साली पुण्याच्या संघाने अंतिम फेरीत धडक मारली होती…ज्यात त्यांना एका धावेने हार पत्करावी लागली होती.

अवश्य वाचा – केन विल्यमसन SRH ची साथ सोडणार?? कर्णधार डेव्हिड वॉर्नर म्हणतो…

नवव्या संघाबाबत बीसीसीआय जो निर्णय घेणार आहे त्यानुसार आगामी आयपीएल हंगामाचा लिलाव पार पडला जाईल. स्पर्धेचं आयोजन भारतात करायचं झाल्यास बीसीसीआयने यासाठी Bio Secure Bubble निर्माण करण्याची तयारीही दाखवली आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२० ( Ipl2020 ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 9 teams in ipl 2021 adani group sanjiv goenka group interested in buying new franchise psd

ताज्या बातम्या