सध्या जगभरात फिफा फुटबॉल वर्ल्ड कपची क्रेझ सुरू आहे. प्रत्येक फुटबॉल सामन्यातील ९० मिनिटे कोणीही गमावू इच्छित नाही. काही चाहते कतारला जाऊन स्टेडियममध्ये सामना पाहण्यास प्राधान्य देत आहेत, तर काही टीव्ही स्क्रीनला चिकटून बसलेले दिसत आहेत. अशात एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. फुटबॉलच्या वेडापायी एक चाहता रूग्णालयात ऑपरेशन दरम्यान फिफा विश्वचषक पाहताना दिसत आहे. ज्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा फुटबॉल चाहता स्वत:चे ऑपरेशन सुरु असताना, फुटबॉल सामना पाहताना दिसत आहे –

चकीत करणाऱ्या या फोटोने भारतीय उद्योगपती आनंद महिंद्रा यांचेही लक्ष वेधून घेतले आहे. ज्यांनी आपल्या फॉलोअर्स विचारले की हा माणूस कोणत्याही प्रकारच्या ट्रॉफीसाठी पात्र आहे का? व्हायरल फोटो कथितपणे पोलिश शहरातील किल्समधील हॉस्पिटलने घेतली आणि शेअर केली आहे. आनंद महिंद्रा यांनी नोट्स फ्रॉम पोलंडच्या ट्विटर अकाऊंटवरून हे ट्विट शेअर केले असून, ‘पोलंडमधील एका रुग्णाने ऑपरेशन थिएटरमध्ये असूनही स्पाइनल ऍनेस्थेसियाखाली वर्ल्ड कप पाहत राहिला. हा फोटो SP ZOZ MSWiA ने शेअर केला आहे, कील्सच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

वेल्स-इराण सामन्यादरम्यान झाले ऑपरेशन –

हेही वाचा – IPL 2023 New Rule: कोणताही विदेशी खेळाडू इम्पॅक्ट प्लेयर बनू शकत नाही, जाणून घ्या काय आहे नवीनतम अपडेट

ट्विटनुसार, पोलंडमधील किल्स येथील रूग्णावर, उपचार करणार्‍या रूग्णालयातून ही घटना समोर आली आहे. त्या व्यक्तीच्या शरीराच्या खालच्या भागात २५ नोव्हेंबर रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याने शल्यचिकित्सकांना विचारले की, तो प्रक्रियेदरम्यान वेल्स आणि इराणमधील फुटबॉल सामना पाहू शकतात का? त्याची विनंती मान्य करण्यात आली आणि ऑपरेशन थिएटरमध्ये टेलिव्हिजन सेट बसवण्याला आला. तसेच त्या व्यक्तीला स्पाइनल ऍनेस्थेसिया देण्यात आले. स्पाइनल ऍनेस्थेसियाचा उपयोग रुग्ण जागृत असताना शरीराला कंबरेपासून खाली सुन्न करण्यासाठी केला जातो.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A fan was watching a fifa world cup 2022 match while his operation was underway see photos vbm
First published on: 09-12-2022 at 12:36 IST