Shakib Al Hasan Video: बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन त्याच्या वर्तनामुळे नेहमीच चर्चेत असतो. अनेक वेळा मैदानावर आणि काही प्रसंगी मैदानाबाहेर वाद झाल्याच्या बातम्या येतात. सध्या इंग्लंडचा संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे. दरम्यान, शाकिबचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो चाहत्याला मारहाण करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये, शेकडो लोकांच्यामध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना, शाकिब एका चाहत्याला मारहाण करताना दिसत आहे.

Sale of pistol by prisoner
पुणे : जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याकडून पिस्तूल विक्री; पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त
Yavatmal, Policeman, Dies, Heart Attack, running practice,
यवतमाळ : धावण्याच्या सरावादरम्यान पोलीस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू
santhan rajiv gandhi case convict
राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषीचा सुटकेनंतर दोन वर्षांनी मृत्यू; आरोपी संथन कोण होता?
Gutkha smuggler Israr Mansoori in police custody nashik
गुटखा तस्कर इसरार मन्सुरी यास पोलीस कोठडी

धक्काबुक्की सुरू होताच शाकिब संतापला –

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, शकिब अल हसनला चाहत्यांनी घेरले आहे. अचानक गर्दीतील काही लोक त्याला आणि त्याच्या सहकाऱ्यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात करतात. चाहत्यांचे हे कृत्य पाहून शाकिबला खूप राग आला. तो टोपी काढतो आणि चाहत्यांच्या डोक्यावर मारायला लागतो. शाकिबला चाहत्याला मारहाण करताना पाहून लोक चकित झाले. त्याचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

क्रिकेटपटू आणि बोर्डाकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही –

हा व्हिडीओ कुठल्या ठिकाणचा आहे, हे अद्याप समजू शकले नसले, तरी बांगलादेशातील बाजारासारखे वातावरण त्यात पाहायला मिळत आहे. अनेकदा वादात सापडलेल्या शाकिबचा व्हिडिओ समोर आल्यानंतर, आता एका नव्या वादात भर पडली आहे. सध्या या प्रकरणी क्रिकेटपटू आणि बोर्डाकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

हेही वाचा – IPL 2023: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; १४० च्या गतीने गोलंदाजी करणारा खेळाडू आयपीएलमधून बाहेर

उल्लेखनीय म्हणजे, बांगलादेशला ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत इंग्लंडकडून १-२ ने पराभव स्वीकारावा लागला होता. आता ते विश्वविजेत्या इंग्लंडला टी-२० मालिकेत पराभूत करण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार पहिल्या सामन्यात बांगलादेशने इंग्लंडवर मात केली आहे. अजून दोन सामने खेळले जाणे बाकी आहेत. दुसरा सामना रविवारी होणार आहे.