David Warner playing cricket in the streets:भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेची (IND vs AUS) क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. या मालिकेला १७ मार्चपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना मुंबईतील प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. ही मालिका सुरू होण्यापूर्वी डेव्हिड वॉर्नर मुंबईत वेळ घालवताना दिसून आला. डेव्हिड वॉर्नर मुंबईच्या रस्त्यांवर क्रिकेटचा आनंद घेत असतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

डेव्हिड वार्नरने घेतला गली क्रिकेटचा आनंद –

बुधवारी वॉर्नरने मुंबईच्या बायलाइन्सवर ‘गली क्रिकेट’ खेळतानाचा व्हिडिओ पोस्ट केला, जिथे तो ‘कठीण खेळपट्टी’वर नेव्हिगेट करताना दिसला. वॉर्नरने व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की, “हिट करण्यासाठी एक शांत रस्ता सापडला आहे.”

Mohammad Nabi's Son Video Viral
IPL 2024 : मोहम्मद नबीच्या गोलंदाजीवर मुलाने मारला ‘हेलिकॉप्टर शॉट’, VIDEO होतोय व्हायरल
Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात
Jos Buttler Officially Changes his Name from Jos to Josh in Mid of IPL 2024 England Cricket Made Announcement With Video
Jos Buttler: जोस बटलरने आपलं नाव बदललं? इंग्लंड क्रिकेटने शेअर केला व्हीडिओ
Pooja Vastrakar's Controversial Post
पंतप्रधान मोदींची टीम वसूली टायटन्स! महिला क्रिकेटरच्या पोस्टने उडाली खळबळ, ट्रोल होताच मागितली माफी

दुस-या कसोटीत कोपरात हेअरलाइन फ्रॅक्चर झाल्याने शेवटच्या दोन कसोटींमधून बाहेर पडला होता. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर मुंबईत आपल्या संघात सामील झाला आहे. वैद्यकीय तज्ज्ञ सामन्यापूर्वी वॉर्नरच्या निवडीबाबत निर्णय घेतील, परंतु प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी उजव्या हाताचा फलंदाज खेळण्यासाठी सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत.

पहिल्या सामन्याला रोहित मुकणार –

बीसीसीआयने या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली, तेव्हा कौटुंबिक कारणांमुळे रोहित मुंबई वनडेसाठी उपलब्ध होणार नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, आता या सामन्यात रोहित मैदान का उतरणार नाही, हे उघड झाले आहे. वास्तविक, पत्नी रितिका सजदेहचा भाऊ कुणाल सजदेहच्या लग्नाला उपस्थित राहणार आहे. त्यामुळे रोहितने पहिल्या वनडेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – IND vs AUS ODI Series: ‘…म्हणून रोहित शर्मा पहिल्या वनडेत खेळणार नाही’, जाणून घ्या काय आहे कारण?

भारत आणि ऑस्ट्रेलियाचा वनडे संघ –

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, रवींद्र जडेजा, विराट कोहली, कुलदीप यादव, सूर्यकुमार यादव, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, केएल राहुल, शुभमन गिल, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक आणि जयदेव उनाडकट.

ऑस्ट्रेलिया: स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, नॅथन एलिस, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, शॉन अॅबॉट, अॅश्टन अॅगर आणि अॅडम झाम्पा.