Premium

Asia Cup 2023 Final: विराटसोबत सेल्फी काढण्यासाठी जमली गर्दी, शुबमन, इशान आणि सूर्याला चाहत्यांनी नाही दिला भाव, पाहा VIDEO

Asia Cup final 2023 IND vs SL Updates: विराट कोहलीसह संपूर्ण भारतीय संघ सध्या कोलंबोमध्ये आहे, जिथे त्यांना रविवारी आशिया कपचा अंतिम सामना खेळायचा आहे. तत्पूर्वी टीम इंडियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Team India video before final viral
विराट कोहलीसोबत सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांनी केली गर्दी (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Asia Cup final 2023 IND vs SL Tema India Video Viral: आशिया कपच्या फायनलमध्ये भारत आणि श्रीलंका हे संघ भिडणार आहेत. या दोन्ही संघांतील हा फायनल सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरुवात होणार आहे. दासून शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामन्याच्या एक दिवस आधी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. शनिवारी सराव सत्र झाले नाही. अशा परिस्थितीत खेळाडूंनी आपापल्या सोयीनुसार वेळ घालवला. त्याच ठिकाणाहून परतत असताना चाहत्यांनी विराट कोहलीसोबत फोटो काढण्यासाठी गर्दी केली होती, तर इतर कोणत्याही क्रिकेटपटूला सेल्फीसाठी विचारले नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

टीम इंडियाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल –

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खेळाडू हॉटेलच्या आत येत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. शुबमन गिल, इशान किशन, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या बाहेर आले, तेव्हा कोणीही फोटो काढण्यासाठी पुढे आले नाही. या सर्व खेळाडूंचे अत्यंत आरामात निघून गेले.

हेही वाचा – Diamond League : नीरज चोप्राने पटकावलं डायमंड लीगचं उपविजेतेपद, बक्षीस म्हणून किती रक्कम मिळाली?

कोहलीसोबत सेल्फी काढण्यासाठी जमली गर्दी –

यानंतर विराट कोहली येताच चाहत्यांनी त्याच्यासोबत फोटो काढण्याचा प्रयत्न सुरू केला. कोहलीला सर्व बाजूंनी चाहत्यांनी घेरले होते. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सर्वांना वेगळे करण्याचा प्रयत्न केला. कोहलीच्या अगदी मागे सूर्यकुमार यादव होता. त्यांच्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. प्रत्येकजण कोहलीसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, इतर एकाही क्रिकेटपटूल चाहत्यांनी फोटोसाठी विचारले नाही. आता या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. कमेंट करताना चाहत्यांनी म्हणत आहेत की, कोहलीची फॅन फॉलोइंग अप्रतिम आहे. तर काहींनी इतर खेळाडूंनाही महत्त्व द्यायला हवे होते, असे म्हटले.

कोहलीला भेटण्यासाठी चाहते पोहोचले होते हॉटेलमध्ये –

विराट कोहलीबद्दल श्रीलंकेत प्रचंड क्रेझ आहे. गेल्या आठवड्यात काही चाहते कोहलीला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये पोहोचले होते. एका तरुणीने कोहलीला हाताने बनवलेले फोटो भेट दिला होता. तिने २००९ पासून कोहलीला भेटण्याची वाट पाहत असल्याचे सांगितले. इतर काही चाहत्यांनीही कोहलीची भेट घेतली आणि त्याच्यासोबत फोटो क्लिक केले. कोहली कुठेही गेला तरी चाहते त्याला भेटायला येतात.

हेही वाचा – Asia Cup Final 2023: ‘मी हे करू शकत नाही, तू वेडा आहेस का?’; फायनल सामन्यापूर्वी रोहित शर्मा शुबमन गिलवर संतापला, पाहा VIDEO

आशिया कप फायनलसाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.

श्रीलंका: पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), सदिरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, दासुन शनाका (सी), दुनिथ वेल्लालगे, दुशन हेमंथा, प्रमोद मदुशन, मथिशा पाथिराना

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A video of fans crowding a hotel to take a selfie with virat kohli before the asia cup final 2023 ind vs sl went viral vbm

First published on: 17-09-2023 at 15:00 IST
Next Story
Asia Cup Final 2023: ‘मी हे करू शकत नाही, तू वेडा आहेस का?’; फायनल सामन्यापूर्वी रोहित शर्मा शुबमन गिलवर संतापला, पाहा VIDEO