Virender Sehwag's son Aryaveer is going viral | Loksatta

Aryaveer Sehwag: दिल्ली क्रिकेट संघात निवड होताच, वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा व्हिडिओ होतोय व्हायरल, पाहा

१५ वर्षीय आर्यवीर सेहवागचा विजय मर्चंट ट्रॉफीसाठी दिल्ली अंडर-१६ संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचे वडील वीरेंद्र सेहवाग यांची झलक आर्यवीरमध्ये दिसत आहे.

Aryaveer Sehwag: दिल्ली क्रिकेट संघात निवड होताच, वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा व्हिडिओ होतोय व्हायरल, पाहा
वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा व्हायरल व्हिडिओ (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

टीम इंडियाचा दिग्गज वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवागला दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या १५ सदस्यीय संघात स्थान देण्यात आले आहे. आर्यवीर १६ वर्षाखालील विजय मर्चंट ट्रॉफी २०२२-२३ मध्ये बिहार विरुद्ध खेळताना दिसू शकतो. आर्यवीर सेहवाग हा उजव्या हाताचा फलंदाज आणि उजव्या हाताचा लेग-स्पिनर आहे. अशात आर्यवीरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

आर्यवीरच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केलेला व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये आर्यवीर नेटमध्ये सराव करत असल्याचा दिसतोय. ज्यामध्ये तो थ्रोडाऊनचा सामना करताना दिसत आहे. आर्यवीरने वडील वीरेंद्र सेहवागच्या शैलीत पहिला शॉट लगावला. पायांची थोडीशी हालचाल करत बॅट आणि बॉलचे शानदार संयोजन केले. पुढे व्हिडिओमध्ये तो अनोख्या शैलीत फलंदाजी करताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये सेहवागचा दीर्घकाळचा दिल्लीचा सहकारी मिथुन मन्हास देखील दिसत आहे. हा व्हिडिओ २०२२ लीजेंड्स लीग क्रिकेट दरम्यान रेकॉर्ड करण्यात आला आहे, असे म्हटले जात आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये होणाऱ्या या लीगमध्ये सेहवाग गुजरात जायंट्सकडून खेळला होता, तर मिथुन मन्हास सहाय्यक प्रशिक्षक होता.

२०१९ मध्ये एका मुलाखतीत सेहवागने सांगितले होते की, त्याच्या मुलांवर क्रिकेटर होण्यासाठी कोणतेही दडपण नाही. सेहवाग म्हणाला होता, ”मला त्याच्यामध्ये दुसरा वीरेंद्र सेहवाग बघायचा नाही. ते विराट कोहली किंवा हार्दिक पंड्या किंवा एमएस धोनी होऊ शकतात. ते त्यांचे करिअर निवडण्यास मोकळे आहेत. आम्ही त्यांना शक्य तितके, ते साध्य करण्यासाठी मदत करू. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, त्यानी एक चांगला माणूस व्हावे.”

हेही वाचा – IND vs BAN 2nd ODI: मेहदी हसनच्या नाबाद शतकाच्या जोरावर, बांगलादेशचे भारताला २७२ धावांचे लक्ष्य

विजय मर्चंट ट्रॉफीसाठी दिल्ली संघ: अर्णव बग्गा (कर्णधार), आर्यवीर सेहवाग, सार्थक रे, प्रणव, सचिन, अनिंदो, श्रेय सेठी (यष्टीरक्षक), प्रियांशू लक्ष्मण, उद्धव मोहन, ध्रुव, किरीट कौशिक, नैतिक माथूर, शंतनू यादव आणि मोहक कुमार.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 16:50 IST
Next Story
David Warner: “क्रिकेटपेक्षा माझे कुटुंब माझ्यासाठी महत्त्वाचे…” डेव्हिड वॉर्नरने कर्णधारपदावरून क्रिकेट ऑस्ट्रेलियावर केली टीका