scorecardresearch

Hardik Vs Krunal: आयपीएलपूर्वी पांड्या बंधूंचा घरातच रंगला सामना; दोघांमधील सामन्याचा VIDEO होतोय व्हायरल

Pandya Brothers Video: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्याचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दोन्ही भाऊ त्यांच्या घरात क्रिकेट खेळत आहेत. यावेळी हार्दिक डान्स करताना दिसत आहे.

Hardik Pandya and Krunal Pandya Updates
हार्दिक आणि क्रृणाल (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Hardik Pandya and Krunal Pandya playing cricket: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ३ सामन्यांची वनडे मालिका १७ मार्चपासून सुरू होत आहे. या मालिकेसाठी हार्दिक पांड्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र, रोहित शर्माच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्या पहिल्या वनडेत संघाचे नेतृत्व करेल. यापूर्वी हार्दिक पांड्या आणि क्रृणाल पांड्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यावर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

पांड्या बंधूंनी घरालाच बनवले क्रिकेटचे मैदान –

क्रृणाल पांड्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या लहान भावासोबत इनडोअर क्रिकेट खेळत आहे. या व्हिडिओमध्ये दोन्ही भावांमध्ये खूप धमाल पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये प्रथम हार्दिक त्याचा भाऊ क्रृणालसाठी गोलंदाजी करत आहे. त्यानंतर क्रुणाल हार्दिकसाठी गोलंदाजी करत आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये हार्दिक क्रृणालप्रमाणेच डाव्या हाताने फलंदाजी करताना दिसत आहे.

व्हिडिओ व्हायरल होत आहे –

दोन्ही भावांचा घरात क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्याने लिहिले की, जर मी हे केले असते तर माझ्या आईने मला घरातून हाकलून दिले असते. आणखी एका यूजरने लिहिले आहे की, दोन्ही भाऊ आयपीएलची तयारी करत आहेत. ३१ मार्चपासून आयपीएल सुरू होत आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात यांच्यात होणार आहे.

हेही वाचा – IND vs AUS 4th Test: शुबमन गिलने मोडला पाकिस्तानच्या युनूस खानचा विक्रम; मिचेल स्टार्कची धुलाई करत रचला विश्वविक्रम

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत दोन्ही बंधू सहभागी आहेत. हार्दिक पांड्या गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार आहे. त्याचबरोबर क्रृणाल पांड्या लखनौ सुपरजायंट्स अष्टपैलू खेळाडू आहे. हार्दिक पांड्या नेतृत्वाखालील गुजरात संघाचा पहिला सामना सीएसकेविरुद्ध होणार आहे.

हार्दिक वनडेत पुनरागमन करेल –

हार्दिक पांड्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत क्रिकेटच्या मैदानावर दिसणार आहे, तर क्रृणास पांड्या आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून खेळताना दिसणार आहे. ३१ मार्चपासून आयपीएलचा सोळावा हंगाम सुरू होत आहे. या वर्षी ही लीग होम-अवे फॉरमॅटमध्ये खेळवली जाईल.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-03-2023 at 15:27 IST