scorecardresearch

Jarrod Kaye: नॉन स्ट्राइक एंडवर धावबाद होताच संतापला फलंदाज, अन् मैदानातच घातला राडा, पाहा VIDEO

Jarrod Kaye Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये नॉन-स्ट्राइक एंडवर धावबाद झाल्यावर फलंदाजाचा संयम सुटतो. त्यानंतर तो मैदानातच राडा घालायला सुरुवात करतो.

Jarrod Kaye Viral Video
जॅरॉड काय (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Southern Cricket Association: नॉन-स्ट्रायकर एंडवरील फलंदाजाला मांकडिग पद्धतीने धावबाद करण्यास आता नियमानुसार परवानगी मिळाली आहे, परंतु फलंदाजांना या पद्धतीने बाद करण्याची अद्याप पसंत नाही. त्यामुळे अनेक वाद होत आहेत. परंतु आता अधिकृतपणे हा नियम पुस्तकात समाविष्ट केला आहे. असे असूनही, नॉन-स्ट्राइक एंडवर मांकडिगने धावबाद झाल्यानंतर फलंदाज असे वागतात की, त्यांना चुकीच्या पद्धतीने बाद घोषित केले आहे. अशीच एक घटना ऑस्ट्रेलियात पाहायला मिळाली, जिथे फलंदाजाने मैदानावर गोंधळ निर्माण केला होता.

जॅरॉड कायने मैदानातच घातला गोंधळ –

ही घटना तस्मानियन सदर्न क्रिकेट असोसिएशन (SCA) च्या फर्स्ट ग्रेड ग्रँड फायनलमध्ये क्लेरमॉन्ट आणि न्यू नॉरफोक यांच्यात गेल्या आठवड्यात घडली. ही घटना जरी देशांतर्गत क्रिकेटची असली, तरी या फलंदाजाने जे केले ते अत्यंत चुकीचे होते. नॉन-स्ट्रायकर एंडवर धावबाद झाल्यानंतर क्लेरेमॉन्टकडून खेळणारा जॅरॉड काय आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकला नाही.

हेल्मेट काढून फेकले –

जॅरॉड काय ५५ चेंडूत ४३ धावांवर फलंदाजी करत असताना, विरोधी गोलंदाज हॅरी बूथने गोलंदाजी न करताच बेल्स पाडत कायला धावबाद केले. त्यावेळी काय क्रीजच्या बाहेर गेला होता. यावरुन गोंधळ निर्माण झाल्याने दोन्ही पंचांमध्ये बरीच चर्चा झाली. त्यानंतर फलंदाज जॅरॉड काय धावबाद घोषित करण्यात आले. दरम्यान, क्रीज सोडताना जॅरॉड कायने मैदानावरच राडा घालायला सुरुवात केली. त्याने हेल्मेट काढून फेकले, मग बॅट फेकली, मग हातमोजे जमिनीवर फेकले. अशा प्रकारे आपला राग व्यक्त करत तो मैदानाबाहेर गेला.

हेही वाचा – IND vs PAK: ‘या’ भारतीय फलंदाजाला पाकिस्तानचा संघ सर्वात जास्त घाबरायचा, अब्दुल रज्जाकने केला खुलासा

आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सर्व गोष्टी त्याने मैदानावर फेकल्या आणि तो थेट ड्रेसिंग रूममध्ये गेला. तथापि, त्याच्या सहकाऱ्यांनी त्याचे सर्व क्रिकेटचे साहित्य गोळा केले. या निर्णयावर त्याचे सहकारीही नाराज होते. पंजाब किंग्जकडून खेळताना जोस बटलरला बाद करताना आर अश्विनने बाद करण्याचा हा प्रकार प्रसिद्ध केला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 17:04 IST

संबंधित बातम्या