Premium

Zaka Ashraf: “दुश्मन मुल्क में…”, पाकिस्तानचा संघ भारतात पोहोचताच पीसीबी अध्यक्षांनी ओकली गरळ, पाहा VIDEO

Zaka Ashraf’s Controversial Statement: बुधवारी रात्री हैदराबादमध्ये बीसीसीआयकडून पाकिस्तान क्रिकेट संघाचे जंगी स्वागत करण्यात आले. यानंतर पीसीसीबीचे अध्यक्ष झका अश्रफ यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Zaka Ashraf's Controversial Statement About India
पीसीसबीचे अध्यक्ष झका अश्रफने भारत देशाचा शत्रू देश म्हणून उल्लेख केला (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

PCB President Zaka Ashraf referring to India as an enemy country: एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेत भाग घेण्यासाठी ७ वर्षानंतर पाकिस्तान क्रिकेट संघ भारतात दाखल झाला आहे. ज्यांचे हैदराबादमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. कर्णधार बाबर आझम आणि रिझवान यांनी भारतात झालेल्या शानदार स्वागताबद्दल भारताचे आभार मानले आहेत. मात्र दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष झका अश्रफ यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे पाहिल्यानंतर भारतीय रागाने लाल होऊ शकतात. भारतात आल्यावर पाकिस्तानी खेळाडूंवर भरभरून प्रेम केले जात आहे. तर दुसरीकडे एक मन दुखावणारे वक्तव्य समोर आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झका अश्रफ जेव्हापासून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष झाले, तेव्हापासून ते भारताविरुद्ध काही ना काही बोलत आहेत. त्यामुळे त्यांना लाजिरवाणेपणाला सामोरे जावे लागत आहे. आशिया चषक २०२३ च्या हायब्रीड मॉडेलबाबत झका अश्रफ यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती आणि बीसीसीआयवर संताप व्यक्त केला होता. आता पाकिस्तानचा संघ विश्वचषकात सहभागी होण्यासाठी भारतीय भूमीवर उतरला आहे. त्यामुळे त्यांचा सूर अचानक बदलला आहे. त्यांचा एक द्वेषाने भरलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी भारताला शत्रू देश असे संबोधले आहे.

झका अश्रफ यांचे वादग्रस्त वक्तव्य –

व्हायरल व्हिडीओमध्ये पीसीबी अध्यक्ष असे म्हणताना ऐकू येते की, “हे खेळाडू आहेत. जेव्हा हे कोणत्या शत्रू देशात किंवा इतर कोणत्या देशात खेळण्यासाठी जातात, जिथे स्पर्धा होत आहे. तिथे तुम्ही जावावे आणि आपल्या देशाला पूर्ण पाठिंबा द्यावा. जेणेकरून ते चांगली कामगिरी करू शकतील.” क्रिकेटच्या बाबतीत अशी विधाने करणे प्रत्येकाने टाळावे. विशेषत: तुम्ही मोठ्या पदावर असताना लोकप्रियता मिळवण्यासाठी अशी वादग्रस्त विधाने करणे टाळावे. झका अश्रफ हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष आहेत.

हेही वाचा – World Cup 2023: विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का! कर्णधार टेंबा बावुमा परतला मायदेशी, जाणून घ्या कारण

बाबर आणि रिझवान यांनी सोशल मीडियावर मानले भारताचे आभार –

त्याच्याकडून अशा विधानांची अपेक्षा करता येणार नाही. जेव्हा खेळाडू कोणत्याही देशात खेळायला जातात. त्यांच्यासाठी कोणताही देश ‘शत्रू देश’ नसतो. बीसीसीआयने असा विचार केला असता तर पाकिस्तानी खेळाडूंचे भव्य स्वागत केले नसते. पाकिस्तानचा क्रिकेट संघ बुधवारी रात्री ८ वाजता विमानतळावर पोहोचला. जिथे रात्री त्याचं इतकं भव्य स्वागत झालं की खुद्द खेळाडूही त्याचं कौतुक केल्याशिवाय राहू शकले नाहीत. कर्णधार बाबर आझम आणि रिझवान यांनी सोशल मीडियावर भारताचे शानदार स्वागत केल्याबद्दल आभार मानले आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A video of pcb president zaka ashraf referring to india as an enemy country has gone viral on social media vbm

First published on: 28-09-2023 at 16:32 IST
Next Story
IND vs AUS: मालिका विजयानंतर टीम इंडियाची ट्रॉफी उंचावणारे कोण होते ‘ते’ चौघे? चाहत्यांना पडला प्रश्न