नवी दिल्ली : राष्ट्रीय प्रशिक्षक ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांची बुधवारी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीने ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. या यादीत अॅथलेटिक्समधील ओ. पी. जैशा आणि कबड्डीमधील विकास कुमार यांचाही समावेश आहे.

ध्यानचंद पुरस्कारासाठी नऊ जणांची, तर द्रोणाचार्य पुरस्कार जीवनगौरव स्वरूपाचा नऊ जणांना आणि नियमित स्वरूपाचा आठ जणांना देण्यात येईल.

ध्यानचंद पुरस्कार (जीवनगौरव) : ओ. पी. जैशा (अॅीथलेटिक्स), दिव्या सिंग (बास्केटबॉल), के. सी. लेखा (बॉक्सिंग), अभिजित कुंटे (बुद्धिबळ), दविंदर सिंग गर्चा (हॉकी), विकास कुमार (कबड्डी), नीर बहादूर गुरुंग (पॅरा-अॅटथलेटिक्स), पी. एस. अब्दुल रसाक (व्हॉलीबॉल), सज्जन सिंग (कुस्ती)

द्रोणाचार्य पुरस्कार (नियमित) : जय प्रकाश नौटियाल (पॅरा-नेमबाजी), महावीर प्रसाद सैनी (पॅरा-अॅाथलेटिक्स), प्रीतम सिवाच (हॉकी), राधाकृष्णन नायर (अॅकथलेटिक्स), संदीप सांगवान (हॉकी), संध्या गुरुंग (बॉक्सिंग), सुजित मान (कुस्ती) आणि सुब्रमण्यम रमन (टेबल टेनिस).

द्रोणाचार्य पुरस्कार (जीवनगौरव) : अशन कुमार (कबड्डी), भास्करचंद्र भट (हॉकी), सी. आर. कुमार (हॉकी), जगरूप राठी (कुस्ती), एस. मुरलीधरन (बॅडमिंटन), सरकार तलवार (क्रिकेट), सरपाल सिंग (हॉकी), तपन कुमार पाणीग्रही (जलतरण), टी. पी. ओसेफ (अॅचथलेटिक्स)