बिंद्राच्या ‘ट्विट’मुळे चाहत्यांचे ठोके चुकले!

अतिशय संयमी व शांत स्वभावाचा खेळाडू म्हणून ख्याती असलेल्या अभिनव बिंद्रा याने ट्विटरवर मंगळवार हा आपला कारकीर्दितील अखेरचा दिवस असल्याचा संदेश पाठविला.

अतिशय संयमी व शांत स्वभावाचा खेळाडू म्हणून ख्याती असलेल्या अभिनव बिंद्रा याने ट्विटरवर मंगळवार हा आपला कारकीर्दितील अखेरचा दिवस असल्याचा संदेश पाठविला. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र रिओ येथे २०१६मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत आपण भाग घेणार असल्याचे त्याने पुढील ‘ट्विट’मध्ये म्हटले आहे.
ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव हा येथील आशियाई स्पर्धेत दहा मीटर एअर रायफलमध्ये उतरला आहे. ‘‘ही आपली व्यावसायिक स्तरावरील अखेरची स्पर्धा असेल व आता केवळ छंद म्हणूनच मी नेमबाजी स्पर्धेत भाग घेणार आहे. अर्थात रिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक हे माझे लक्ष्य असणार आहे,’’ असे बिंद्रा याने ‘ट्विटर’वर म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Abhinav bindra fans surprise on his retirement tweets