कोलकाता नाईट रायडर्सच्या आयपीएल २०२४ च्या विजेतेपदाच्या लढतीत संघाचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी मोलाची भूमिका बजावली. गेल्या महिन्यात चेन्नई येथे झालेल्या फायनलमध्ये केकेआरने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केल्यानंतर जेतेपद आपल्या नावे केले. या विजयानंतर वरुण चक्रवर्ती आणि व्यंकटेश अय्यर यांनी या अनुभवी क्रिकेटपटूचे कौतुक केले होते. केवळ आयपीएलमध्येच नाही तर २०२२ मध्ये टी-२० विश्वचषक संघात स्थान मिळवण्यासाठी दिनेश कार्तिकच्या पुनरागमनात नायरने सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

अभिषेक नायरने नुकतीच यूट्यूबर रणवीर अल्लाहबादियाच्या पॉडकास्ट शोमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीदरम्यान एका प्रश्नाने नायर थक्क झाला. खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होतो अशी सर्वसाधारण धारणा असल्यामुळे खेळाडूंना लैंगिक संबंध ठेवण्याचा सल्ला दिला जातो की नाही याबद्दलचा प्रश्न पोडकास्टमध्ये रणवीरने त्याला विचारला.

हेही वाचा- बाबर आझमला इंग्रजीत विचारलेला प्रश्नच कळला नाही, पाकिस्तानच्या कर्णधाराचं उत्तर ऐकाल तर… VIDEO व्हायरल

मुलाखतीतील या उत्तरामध्ये अभिषेक नायरने बरेच मोकळेपणाने उत्तर दिले. याबद्दल सांगताना ब्राझीलच्या रोनाल्डो नाझारियोने केलेले वक्तव्य त्याने पुन्हा सांगितले. २००२ च्या फिफा विश्वचषक विजेतेपदासाठी संघाला प्रेरणा देणाऱ्या ब्राझिलच्या दिग्गज फुटबॉलपटूला विजयानंतर विचारण्यात आले की सेक्स करण्यापेक्षा हे चांगले आहे की नाही आणि तेव्हा फुटबॉलपटूने उत्तर देत सांगितले: “मी सामन्यांपूर्वी अनेकदा सेक्स केलं आहे. यामुळे खेळताना एकाग्र होऊन खेळण्यास मदत होते. पण बरेचसे प्रशिक्षक तुम्हाला सामन्यापूर्वी सेक्स न करण्याचा सल्ला देतात. मला जाणवले की, काही सामन्यांमध्ये मी अधिक चांगला खेळू शकलो कारण मी त्याआधी सेक्स केलं होतं.”

‘द रणवीर शो’मध्ये बोलताना, नायर सुरुवातीला अँकरच्या प्रश्नावर चकित झाला होता. या दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं, पाहूया

अँकर: ‘एक शेवटचा विषय, क्रिकेटमधील सेक्स? खेळाडूंच्या जीवनात हा सेक्स हा घटक आहे का?’

हेही वाचा – T20 WC 2024: विल्यमसनला अफगाणिस्तानविरूद्ध पराभवाची आधीच होती कल्पना? सामन्यापूर्वी म्हणाला होता….

नायर: “तू हे सकारात्मक पद्धतीने विचारत आहेस की नकारात्मक म्हणून? कारण हा प्रश्न तू खूप मोकळेपणाने विचारला आहे. हो खेळाडूंच्या जीवनातही हा घटक आहे. त्याशिवाय कोणता माणूस जगेल? पण ते चांगले की वाईट? हा तुझा प्रश्न आहे का? की तुझा प्रश्न हा आहे किती सेक्स होतं? “

अँकर – ‘मला याचं उत्तर द्यायचं आहे, पण मला तुम्ही नेमकं काय उत्तर देता हेही पाहायचे आहे.’

हेही वाचा – T20 WC 2024: रोहित शर्माच्या नावे वर्ल्ड रेकॉर्ड, ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिलाच फलंदाज

अभिषेक नायर – “सेक्स करणं ही साधारण गोष्ट आहे. पण ते प्रत्येकासाठी वेगळंही आहे. प्रत्येक क्रिकेटपटूच्या मनात सतत द्वंद्व सुरू असतं. काहींना ते आवडतं तर काही जण ते टाळतात. काहींना असं वाटतं की लैंगिक संबंध न ठेवल्यास शक्ती वाढते, अधिक एकाग्रतेने खेळावर लक्ष केंद्रित करता येतं. तर काहीजण सेक्स करतात आणि त्यांच्यासाठी काहीही बदललेले नाही, सगळं नॉर्मल आहे असं त्यांना वाटतं. त्यामुळे ही एक अतिशय वैयक्तिक बाब आहे. यासाठी कोणताही नियम नाही. वस्तुस्थिती अशी आहे की, जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या गोष्टी काम करत असतात. कुणीही हपापलेलं नाही पण काही वेळेला एवढं दडपण असतं की मोकळेपणाने आनंद घ्यावासा वाटतो.”

अभिषेक नायरने या प्रश्नाप्रमाणेच अनेक मुद्दयांवर मोकळेपणाने भाष्य केले. काही क्रिकेटमधील आठवणी सांगितल्या तर रोहित शर्माच्या ट्रेनिंगविषयी त्याच्या सरावाविषयीही त्याने किस्से सांगितले. आता पुढील आयपीएल २०२५ मध्ये अभिषेक नायर केकेआरसोबत पुन्हा मैदानावर दिसणार आहे.