Abhishek Porel Ranji Trophy century comeback after jail release: बंगालचा क्रिकेटपटू अभिषेक पोरेल ३६ दिवसांनी तुरूंगातून जामिनावर सुटका झाल्यानंतर रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळत आहे. बलात्काराच्या आरोपानंतर पोरेलला अटक करण्यात आली होती. वाद, कायदेशीर अडचणी आणि ३६ दिवस तुरुंगवास अशा कठीण प्रसंगांना सामोरे गेल्यानंतर अभिषेक पोरेलने मैदानावर शतकी खेळी करत भावुक पुनरागमन केलं. शतक केल्यानंतर अभिषेक मैदानावर बसून शतक झळकावताना दिसला.

बलात्कार आणि गुन्हेगारी स्वरूपाची धमकी दिल्याप्रकरणी दाखल असलेल्या खटल्यात पोरेलची नुकतीच जामिनावर सुटका झाली आहे. क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने अभिषेक पोरेलने २०२६-२७ च्या रणजी ट्रॉफी स्पर्धेतील सलामीच्या सामन्यासाठी निवडलेल्या संघात त्याची निवड करण्यात आली होती आणि पहिल्याच सामन्यात त्याने शतक झळकावत ही निवड सार्थ ठरवली.

‘एलिट ग्रुप-सी’मधील सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दिल्लीविरुद्ध झुंजार शतक झळकावून त्याने आपल्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं. शतक पूर्ण होताच तो भावुक झाला आणि थेट खेळपट्टीवरच बसून ढसाढसा रडू लागला.

बंगाल आणि दिल्ली यांच्यातील सामन्यात दिल्लीचा संघ पहिल्या डावात २४० धावांत सर्वबाद झाल्यानंतर, बंगालच्या डावाची सुरूवात करण्याची जबाबदारी अभिषेक पोरेलला देण्यात आली. जवळपास तीन महिन्यांनंतर स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतलेल्या पोरेलने सुरुवातीपासूनच आपला उत्तम फॉर्म दाखवून दिला. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने ११ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने अवघ्या १३७ चेंडूंत शतक पूर्ण केलं. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा तो ११४ धावांवर नाबाद होता; त्याने सुदीप कुमार घरामी याच्यासह चौथ्या विकेटसाठी १९९ धावांची अभेद्य भागीदारी साकारली.

दुलीप ट्रॉफी आणि इराणी कपसारख्या स्पर्धांपासून दूर राहिल्यानंतर, थेट रणजी ट्रॉफीद्वारे या प्रकारात पुनरागमन केल्यापासून पोरेलचं हे दुसरं प्रथम श्रेणी शतक आहे. याआधी, जून २०२६ मध्ये बंगाल टी-२० लीगमध्ये कोलकाता टायगर्सकडून खेळताना तो उत्कृष्ट लयीत होता; तिथे त्याने सहा डावांत ६८.७५ ची सरासरी आणि १५९.८८ च्या स्ट्राईक रेटसह एकूण २७५ धावा केल्या होत्या. याव्यतिरिक्त, २०२६ च्या आयपीएल (IPL) दरम्यान तो दिल्ली कॅपिटल्सच्या संघातही होता.