Abhishek Sharma IPL Record: आयपीएल २०२६च्या रायव्हलरी विकमधील अखेरचा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांमध्ये खेळवली जात आहे. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अभिषेक आणि ट्रॅव्हिस हेड यांनी पहिल्या विकेटसाठी ७५ धावांची भागीदारी करून संघाला वेगवान सुरुवात करून दिली. सीएसकेविरूद्ध अभिषेक शर्माची बॅट चांगलीच तळपली. त्याने अवघ्या १५ चेंडूत अर्धशतक झळकावलं. या खेळीदरम्यान त्याने वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडत मोठी कामगिरी केली.

अभिषेक शर्माने या सामन्यात उत्कृष्ट ५९ धावांची खेळी साकारली. अभिषेकच्या ५९ धावांच्या शानदार खेळीने, माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडून एक मोठा आयपीएल विक्रम आपल्या नावे केला आहे. यासह सेहवागचा विक्रम मोडत अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिला खेळाडू ठरला आहे.

गेल्या काही हंगामांमध्ये आयपीएलमध्ये अनेक मोठे विक्रम मोडले गेले आहेत, ज्याचे मुख्य कारण फलंदाजीच्या शैलीतील लक्षणीय बदल आहे. अभिषेक शर्मा आता आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी चेंडूंमध्ये २ हजार धावा पूर्ण करणारा खेळाडू ठरला आहे. अभिषेकने अवघ्या ११९३ चेंडूंमध्ये हा पराक्रम केला आणि ११२० चेंडूंमध्ये २ हजार आयपीएल धावा पूर्ण करणाऱ्या आंद्रे रसेलला मागे टाकलं. अभिषेक शर्माने वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडला, जो यापूर्वी हा टप्पा सर्वात जलद गाठणारा भारतीय खेळाडू होता. वीरेंद्र सेहवागने १२११ चेंडूंमध्ये २ हजार आयपीएल धावा पूर्ण केल्या होत्या.

आयपीएलमध्ये सर्वात कमी चेंडूंमध्ये २ हजार धावा करणारे खेळाडू

आंद्रे रसेल – ११२० चेंडू
अभिषेक शर्मा – ११९३ चेंडू
निकोलस पूरन – ११९८ चेंडू
वीरेंद्र सेहवाग – १२११ चेंडू
ख्रिस गेल – १२५१ चेंडू

इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात २० चेंडूंच्या आत सर्वाधिक अर्धशतकं करण्याचा विक्रम अभिषेक शर्माच्या नावावर आहे, त्याने ही कामगिरी सहा वेळा केली आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर वैभव सूर्यवंशी, जॅक फ्रेझर मॅकगर्क, ट्रॅव्हिस हेड आणि निकोलस पूरन आहेत, ज्यांनी प्रत्येकी तीन वेळा हा पराक्रम केला आहे. अभिषेक शर्मा हा आयपीएलच्या इतिहासातील एकमेव फलंदाज आहे, ज्याने मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघांविरुद्ध २० पेक्षा कमी चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावलं आहे.