India vs West Indies 4th T20I: भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये पार पडलेल्या चौथ्या टी-२० सामन्यात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला. दोन्ही डावात फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली. पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी शे होपने १०१ धावांची वादळी शतकी खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने संघाची धावसंख्या २४७ धावांवर पोहोचवली. या धावांचा पाठलाग करताना अभिषेक शर्माने २४ चेंडूंमध्ये २९ धावांची सुरूवात केली. या छोट्या खेळीदरम्यान त्याने ३ चौकार आणि १ षटकार खेचला. या एकमेव षटकारासह त्याने भारताच्या टी-२० संघाचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादवचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

अभिषेक शर्माने मोडला सूर्यकुमार यादवचा रेकॉर्ड

अभिषेक शर्मा हा टी-२० क्रिकेटमधील सर्वात स्फोटक सलामीवीर फलंदाजांपैकी एक आहे. पहिल्या चेंडूपासून षटकार मारण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिषेकने भारतीय संघात सलामीवीर म्हणून आपलं स्थान पक्क केलं आहे. यावर्षी फलंदाजी करताना त्याची बॅट चांगलीच तळपली. आतापर्यंत झालेल्या ३३ सामन्यांमध्ये फलंदाजी करताना त्यने २९.६८ च्या सरासरीने ९५० धावा कुटल्या आहेत. लवकरच तो १००० धावांचा पल्ला गाठू शकतो. यादरम्यान फलंदाजी करताना त्याने ६९ षटकार खेचले आहेत. यासह तो टी-२० आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच वर्षांत सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. याआधी हा रेकॉर्ड सूर्यकुमार यादवच्या नावावर होता. सूर्याने २०२२ मध्ये ३१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण ६८ षटकार खेचले होते.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच वर्षात सर्वाधिक षटकार खेचणारे भारतीय फलंदाज

अभिषेक शर्मा- ६९ षटकार (२०२६)
सूर्यकुमार यादव- ६८ षटकार (२०२२)
अभिषेक शर्मा- ५४ षटकार (२०२४)
इशान किशन- ५३ षटकार (२०२६)
संजू सॅमसन – ४४ षटकार (२०२६)

यासह अभिषेक शर्माच्या नावे आणखी एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. अभिषेक शर्मा हा आयसीसीच्या फुल मेंबर्स नेशन्समध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकाच वर्षांत सर्वाधि षटकार खेचणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. या रेकॉर्डमध्येही त्याने सूर्युकमार यादवला मागे टाकलं आहे. आता पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी भारतीय फलंदाजांचाच दबदबा पाहायला मिळाला आहे.