Abhishek Sharma Record: भारत आणि आयर्लंड यांच्यातील २ टी-२० सामन्यांची मालिका झाल्यानंतर आता भारत आणि इंग्लंड टी-२० मालिकेला सुरुवात झाली आहे. ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना चेस्टर ले स्ट्रीटच्या रिव्हरसाईड ग्राऊंडच्या मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना अभिषेक शर्माने दमदार सुरुवात करुन दिली. यादरम्यान त्याने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

अभिषेक शर्मा हा सुरुवातीपासूनच मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारतीय संघाला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. संजू सॅमसन आणि इशान किशन दोघेही स्वस्तात माघारी परतले. पण अभिषेक शर्माने श्रेयस अय्यरसोबत मिळून डाव सावरला. यादरम्यान इंग्लंडकडून चौथे षटक टाकण्यासाठी साकिब महमूदच्या चौथ्या षटकात अभिषेक शर्माने १ चौकार आणि २ गगनचुंबी षटकार खेचले. अभिषेक शर्माने २० चेंडूंमध्ये आपलं शतक पूर्ण केलं. यादरम्यान त्याने ५९ धावांची दमदार खेळी केली. यासह त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०० षटकार खेचण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

अभिषेक शर्मा हा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद (कमी चेंडूंमध्ये) १०० षटकार खेचणारा फलंदाज ठरला आहे. अभिषेकने हा कारनामा ७८५ चेंडूंमध्ये केला आहे. तर या यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या एविन लुईसच्या नावे ७८९ चेंडूंमध्ये १०० षटकार खेचण्याची नोंद आहे. तर फिन अॅलेनने ८७१ चेंडूंमध्ये १०० षटकार खेचले होते. तर टिम डेव्हिडने ९३१ चेंडूंमध्ये १०० षटकार खेचले होते. या यादीत सूर्यकुमार यादवचा देखील समावेश आहे. सूर्याने १००७ चेंडूंमध्ये १०० षटकार खेचले होते.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद (कमी चेंडूंमध्ये) १०० षटकार खेचणारे फलंदाज

अभिषेक शर्मा- ७८५ चेंडू
एविन लुईस- ७८९ चेंडू
फिन अॅलेन- ८७१ चेंडू
टिम डेव्हिड- ९३१ चेंडू
कॉलिन मुनरो- ९६३ चेंडू
सूर्यकुमार यादव- १००७ चेंडू