Team India cannot win the World Cup without Jasprit Bumrah: भारताला या महिन्यात आयर्लंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. जसप्रीत बुमराह १० महिन्यांनंतर टीम इंडियात पुनरागमन करत आहे. परतीच्या मालिकेतच बुमराहला कर्णधार बनवण्यात आले आहे. त्याच्या कामगिरीवर सर्व चाहत्यांची नजर असेल. बुमराहचा अनुभव संघासाठी मोलाचा ठरेल, असा विश्वास भारताचा माजी स्टार फलंदाज मोहम्मद कैफने व्यक्त केला.

मोहम्मद कैफ म्हणाला, नॉकआऊट सामन्यांमध्ये टीम इंडियासाठी बुमराह खूप महत्त्वाचा असणार आहे. जर तो खेळला नाही, तर आशिया कप २०२२ आणि टी-२० वर्ल्ड कप २०२२ मध्ये टीम इंडियाचे जे झाले तेच होईल. आशिया चषक स्पर्धेतील सुपर-फोर फेरीत भारताचा पराभव झाला होता, तर टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंडने १० विकेट्सने पराभव केला होता. तो म्हणाला की, भारताकडे दोन किंवा तीन संघ उतरवण्याची क्षमता आहे, पण गोलंदाजीत तितकी खोली नाही.

Duleep Trophy 2024 Rishabh Pant joins Shubman Gill lead A team
ऋषभने आपल्या कृतीने जिंकली पुन्हा चाहत्यांची मनं, विरोधी संघाची रणनीती जाणून घेण्यासाठी केलं असं काही की…
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Taylor Fritz and Frances Tiafoe of the United States in the men singles semifinals at the US Open sport news
फ्रिट्झची उपांत्य फेरीत धडक, टियाफोचे आव्हान; महिलांमध्ये नवारो-सबालेन्का एकमेकांसमोर
Najmul Shanto on Team India
Najmul Shanto : बांगलादेशच्या कर्णधाराचे ऐतिहासिक विजयानंतर मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताविरुद्ध पण आम्ही…’
unil Gavaskar statement regarding the series in Australia that India is expected to dominate sport news
भारताचेच वर्चस्व अपेक्षित! ऑस्ट्रेलियातील मालिकेबाबत गावस्करांचे भाकीत
Australia Mitchell Starc Statement on the Border Gavaskar Trophy sport news
अॅशेसइतकेच महत्त्व! बॉर्डर-गावस्कर करंडकाबाबत ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कचे विधान
Gautam Gambhir Picks All Time World XI He Has Played Against and Includes 3 Pakistan Players
Gautam Gambhir: गौतम गंभीरने निवडली ऑल टाईम इलेव्हन; पाकिस्तानच्या तीन खेळाडूंना मिळालं स्थान
Vikram Rathour on Rohit Sharmas Game Plan
Rohit Sharma : विसरभोळ्या रोहितबद्दल माजी बॅटिंग कोचचा मोठा खुलासा; म्हणाले, ‘तो फक्त ड्रेसिंग रुममधील ‘ही’ गोष्ट विसरत नाही’

कैफ म्हणाला, सध्या जे खेळाडू जखमी आहेत, ते विश्वचषकात भारतासाठी खूप महत्त्वाचे असतील. त्यांच्या पुनरागमनावर टीम इंडियाच्या आशा टिकून आहेत. बुमराहचे प्रदीर्घ कालावधीनंतर संघात पुनरागमन झाले असून तो खेळल्यानंतरच तो किती तंदुरुस्त आहे हे कळेल. मायदेशात विश्वचषकात चांगली कामगिरी करण्यासाठी भारताला पूर्णपणे तंदुरुस्त बुमराहची गरज आहे. गोलंदाजी विभागात तुमच्याकडे दोन संघ असू शकत नाहीत. जर बुमराहने वर्ल्ड कप खेळला नाही, तर टीम इंडिया या स्पर्धेतून बाहेर पडेल. आशिया चषक टी-२० २०२२ आणि टी-२० विश्वचषक २०२२ प्रमाणेच संघाचे भवितव्य असेल. कारण आपल्याकडे बुमराहसाठी बॅकअप नाही.

हेही वाचा – Sunil Dev : टी-२० विश्वचषक विजेत्या टीम इंडियाच्या व्यवस्थापकाचे निधन, वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

४२ वर्षीय कैफ म्हणाला की, सध्या आमचा संघ मजबूत दिसत नाही. तो म्हणाला, टीम इंडिया सध्या कमकुवत दिसत आहे. कारण केएल राहुल, ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यरसारखे अनेक महत्त्वाचे खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. कैफने वेस्ट इंडिजमधील एकदिवसीय मालिकेदरम्यान भारतीय संघ व्यवस्थापनाच्या प्रयोगांबद्दलही सांगितले. संघ व्यवस्थापनाने नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडेसाठी विश्रांती दिली होती.

कैफ पुढे म्हणाला, वेस्ट इंडिजमध्ये त्यांनी काय केले यावरूम मी संघाला जज करणार नाही. होय, मला असे म्हणायचे आहे की, जर रोहित शर्मा आणि विराट कोहलीला ब्रेक हवा होता, तर त्यांना संघात स्थान मिळायला नको होते. आशिया चषकानंतर मी या संघाला जज करेन आणि त्या १५ खेळाडूंचेही विश्लेषण करेन. आशिया चषकानंतर, या संघाला माहित असले पाहिजे की त्यांचे प्लेइंग-११ कोणती आहे आणि त्यांचे बॅकअप कोण आहेत. विश्वचषकात इशान किशनचा राखीव यष्टीरक्षक म्हणून समावेश करण्याचा सल्लाही कैफने दिला.

हेही वाचा – Manoj Tiwary Retirement: टीम इंडियाच्या फलंदाजाने विश्वचषकापूर्वी घेतली निवृत्ती, सोशल मीडियावर शेअर केली भावनिक पोस्ट

मोहम्मद कैफ म्हणाला, इशानने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. मला अजूनही खात्री नाही की इशान, सूर्यकुमार, संजू सॅमसन आणि श्रेयस अय्यर १५ मध्ये एकत्र असतील की नाही. राहुल जर विश्वचषक खेळला, तर त्याचा बॅकअप यष्टिरक्षक कोण असेल हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. इशानला बॅकअप म्हणून ठेवावे. टीम इंडिया उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरेल, असे कैफला वाटते. तो म्हणाला, भारतीय संघासाठी विश्वचषक उपांत्य फेरीपासून सुरू होईल. वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्यासाठी टीम इंडियाला दोन मोठे आणि महत्त्वाचे सामने जिंकावे लागतील.