scorecardresearch

Premium

ODI WC 2023: “उजव्या हाताच्या फलंदाजांमध्ये एकही टॉप ऑर्डर बॅट्समन..”; सलमान बटने सांगितल्या भारताच्या उणीवा

Salman Butt’s Reaction on Team India: ५ ऑक्टोबरपासून आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ ही स्पर्धा भारतात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाने तयारी सुरु केली आहे. दरम्यान पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी टीम इंडियाच्या तयारीवर प्रतिक्रिया देताना, संघातील उणीवा सांगितल्या आहेत.

According to Salman Butt Team India has not been playing well against spinners
सलमान बट (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Team India has not been playing well against spinners in recent times: यावर्षी एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार आहे. त्यासाठी सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. ही स्पर्धा ५ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. त्याच वेळी, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर १४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वी अनेक दिग्गज खेळाडूंनी आपले मत मांडले आहे. पाकिस्तानचा माजी खेळाडू सलमान बटनेही टीम इंडियाबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे. खरे तर भारत फिरकीपटूंना चांगले खेळवत नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. तसेच, भारताला शिखर धवनची गरज भासणार असल्याचेही तो म्हणाला.

पाकिस्तानचा माजी खेळाडू सलमान बट आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला की, अलीकडच्या काळात टीम इंडिया स्पिनर्सविरुद्ध चांगले खेळत नाही. ते पारंपारिकपणे फिरकीपटूंविरुद्ध मजबूत आहे, परंतु आता ते नियंत्रण आपल्याला दिसत नाही. त्यामुळे टीम इंडियाला याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Hanuma Vihari Leaving AP Cricket Association Politics Leaving Captaincy
Hanuma Vihari : खळबळजनक! भारतीय क्रिकेटपटूला नेत्याच्या मुलावर ओरडणं पडलं महागात, द्यावा लागला राजीनामा
India vs England 4th Test Match Toss Updates in marathi
IND vs ENG 4th Test : कोण आहे आकाश दीप? ज्याने रांची कसोटीत भारतासाठी केले पदार्पण
india vs england 3rd test playing xi sarfaraz jurel set for debut
अननुभवी मधल्या फळीची कसोटी! भारत इंग्लंड तिसरा सामना आजपासून; सर्फराज, जुरेलच्या पदार्पणाची शक्यता
Umpire stops Australia Wicket celebrations no appeal For run out Rule For Not Out AUS vs WI T20I Highlights Second Win After IND vs AUS
ऑस्ट्रेलियाचं सेलिब्रेशन पंचांनी थांबवलं; बाद असूनही ‘त्याला’ घोषित केलं नाबाद, क्रिकेटचा हा नियम काय सांगतो?

प्रत्येक दौऱ्यात टीम इंडियात खूप बदल होतात –

सलमान बट पुढे म्हणाला की, प्रत्येक दौऱ्यात बरेच बदल होत असतात. आता वेळ आली आहे, विश्वचषकापूर्वी तुम्ही तुमचे १५ खेळाडू निवडा आणि प्रत्येक खेळाडूला त्याची भूमिका माहीत असेल. जर तुम्हाला एखाद्याला विश्रांती घ्यायची असेल आणि वेगवेगळे कॉम्बिनेशन वापरायचे असतील तर फक्त ए टीम पाठवा. सर्व खेळाडूंना विश्रांती द्या.

हेही वाचा – Shreyas Harish: १३ वर्षीय भारतीय रेसरचा चॅम्पियनशिपदरम्यान अपघाती मृत्यू, रेसिंग विश्वात पसरली शोककळा

तो पुढे म्हणाला की, “जर तुमच्या पहिल्या प्लेइंग इलेव्हनमधील निम्मे खेळाडू तिथे असतील आणि अर्धे नसतील, तर हा तुमचा मुख्य संघ आहे असे तुम्ही म्हणू शकत नाही. सूर्यकुमार यादव, इशान किशन, शुभमन गिल या खेळाडूंपैकी कोणीही नवीन नाही. त्यांची वनडेत द्विशतके, आयपीएलमध्ये शतके आहेत. अजिंक्य रहाणे ज्या प्रकारे आयपीएलमध्ये खेळला आहे आणि ज्या प्रकारे त्याने कसोटीत पुनरागमन केले आहे, तो एक संभाव्य पर्याय आहे. टीम इंडियाला शिखर धवनचीही गरज पडेल.”

सलमान बट पुढे म्हणाला की, “उजव्या हाताच्या फलंदाजांमध्ये मला एकही टॉप ऑर्डर बॅट्समन दिसत नाही, जो त्याच्याप्रमाणेच ओपन करू शकेल. एकतर शिखर धवन आणि शुबमन गिल ओपन करू शकतात आणि रोहित शर्मा वन डाउन द ऑर्डर खेळू शकतो किंवा रोहित शिखरसोबत ओपन करू शकतो. टीम इंडियाला वर्ल्ड कपमध्ये अनुभवाची गरज आहे. त्यामुळे त्यांना ५ किंवा ६ क्रमांकावर खेळाडू हवा आहे, एकतर तो राहुल असू शकतो किंवा तो रहाणे असू शकतो. दडपण असताना

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: According to salman butt team india has not been playing well against spinners in recent times vbm

First published on: 06-08-2023 at 09:52 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×