England vs New Zealand 2nd Test, Jacob Bethell Catch: न्यूझीलंडचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना द ओव्हलच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या न्यूझीलंडला एका पाठोपाठ ४ मोठे धक्के बसले आहेत. दरम्यान सलामीवीर फलंदाज टॉम लेथमला बाद करण्यासाठी जेकब बेथलने भन्नाट कॅच घेतला आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडकडून टॉम लेथम आणि डेव्हॉन कॉन्वेची सलामी जोडी मैदानात आली. न्यूझीलंडला अवघ्या १४ धावांवर पहिला धक्का बसला. कॉन्वे अवघ्या ९ धावा करुन माघारी परतला. मॅथ्यू फिशरने त्याला झेलबाद करत माघारी धाडलं. त्यानंतर जोफ्रा आर्चरने टॉम लेथमला बाद केलं.

तर झाले असे की, इंग्लंडकडून २१ वे षटक टाकण्यासाठी जोफ्रा आर्चर गोलंदाजीला आला. त्यावेळी टॉम लेथम स्ट्राईकवर होता. आर्चरने डावखुऱ्या हाताच्या लेथमविरूद्ध राऊंड द विकेटचा मारा करताना पॅड लाईनवर चेंडू टाकला. हा चेंडू लेथमने फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटची कडा घेऊन गलीच्या दिशेने गेला. गलीमध्ये क्षेत्ररक्षण करत असलेल्या जेकब बेथलने डाईव्ह मारुन भन्नाट कॅच घेतला. हा कॅच पाहून लेथमलाही आश्चर्याचा धक्का बसला. लेथम अवघ्या २७ धावा करुन माघारी परतला. तर डेव्हॉन कॉन्वे अवघ्या ९ धावा करुन माघारी परतला. हेन्री निकोल्सने २४ धावांचे योगदान दिले. तर रचिन रवींद्र ३३ धावा करुन माघारी परतला.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेईंग ११:

न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): टॉम लेथम(कर्णधार), डेव्हॉन कॉन्वे, हेन्री निकोल्स, रचिन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम ब्लंडेल(यष्टिरक्षक), ग्लेन फिलिप्स, नाथन स्मिथ, काईल जेमिसन, मॅट हेन्री, विल्यम ओरूर्क

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): बेन डकेट, एमिलिओ गे, जेकब बेथेल, जो रूट(कर्णधार), हॅरी ब्रूक, जेम्स रियू(यष्टिरक्षक), जॉर्डन कॉक्स, जोफ्रा आर्चर, जोश टंग, मॅथ्यू फिशर, सोनी बेकर