एएफसी महिला आशिया चषक स्पर्धेत रविवारी भारत आणि चायनीज तैपेई यांच्यातील सामना रद्द करण्यात आला आहे. भारतीय महिला फुटबॉल संघात करोनाने शिरकाव केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. भारताचे १३ खेळाडू करोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे संघाकडे मैदानात उतरण्यासाठी पुरेसे खेळाडू नव्हते. महिला आशिया कपच्या ट्विटरवरून ही माहिती देण्यात आली. अखिल भारतीय फुटबॉल महासंघानेही (एआयएफएफ) ही माहिती दिली.
या स्पर्धेतील भारताचा हा दुसरा सामना होता, पण संघाला मैदानात उतरता आले नाही. भारताने पहिला सामना इराण विरुद्ध बरोबरीत सोडवला. त्यामुळे ही चायनीज तैपेईविरुद्धचा सामना भारतासाठी करा किंवा मरो असा होता.
हेही वाचा – टीम इंडियाचा टेस्ट कॅप्टन कोण असावा? शास्त्री म्हणाले, ‘‘जर रोहित फिट असेल…”
आज रविवारी डी. वाय. पाटील स्टेडियमवर भारत आणि चायनीज तैपेई यांच्यात सामना रंगणार होता. परंतु करोना प्रकरणांमुळे स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्याची भारताची आशा संपुष्टात आली आहे.