AFG vs NZ Greater Noida Catering Using Toilet Water: न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील कसोटी सामना ग्रेटर नोएडा स्टेडियममध्ये ९ सप्टेंबरपासून खेळवला जाणार होता, मात्र ओली आऊटफिल्ड आणि तेथील साधारण सुविधांमुळे दोन दिवसांचा खेळ रद्द झाला आहे. आता या मैदानाच्या दुरावस्थेचे पडसाद संपूर्ण क्रिकेट विश्वात उमटले आहेत. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे मैदानाची दुरावस्था झाली असून जागतिक दर्जाच्या सुविधांचा तीव्र अभाव जाणवू लागला आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी चांगली सुविधा नव्हती तर मैदानावरील अनेक ठिकाणी मैदान इतके ओले होते की ते सुकत नव्हते, ज्यामुळे अजूनही नाणेफेकही न होता दोन्ही दिवसांचा खेळ रद्द झाला. आता यानंतर अजून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.

हेही वाचा – Musheer Khan: मुशीर खानच्या खेळीवर अजित आगरकर फिदा; फक्त ७ सामने खेळूनही जाणार ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर

आता खाण्यापिण्याच्या सुविधांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका नवीन फोटोत असे दिसते की स्वयंपाकी वॉशरूममधून भांड्यात पाणी भरत आहेत. संपूर्ण ग्राउंड स्टाफ अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात गोष्टी मार्गी लावण्यात व्यस्त आहे. एकीकडे स्टेडियम कोरडे करणं ही ग्राऊंड स्टाफसाठी मोठी समस्या असल्याचे दिसून येत आहे. आता स्वयंपाकी वॉशरुमच्या वॉश-बेसिनमध्ये भांडी धुतानाचे फोटो समोर आले आहेत. इतकेच नव्हे तर स्वयंपाक करण्यासाठी भांड्यात पाणीही टॉयलेटमधील नळातून भरण्यात आले.

हेही वाचा – Babar Azam: ऐनवेळी पँट मिळाली नाही, बाबर आझम थेट टॉवेल गुंंडाळून आला; VIDEO व्हायरल

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) यापूर्वीच मैदानाच्या सुविधांबाबत आक्षेप घेतला आहे. स्पोर्ट्स तकच्या म्हणण्यानुसार, एसीबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “येथे सुविधा नावाची कोणतीही गोष्ट नाही, आम्ही इथे परत येणार नाही. आमची पहिली पसंती लखनौला असेल. इथे साध्या सुविधाही नाहीत. या ठिकाणी संपूर्ण गैरव्यवस्थापन आहे. इतकंच नव्हे तर खेळाडूही प्रशिक्षण सुविधा आणि सर्व गोष्टींबाबत खूश नाहीत.”

हेही वाचा – Saina Nehwal: ऑलिम्पिक पदक गिफ्ट मिळालं म्हणणाऱ्यांवर सायना नेहवालचा संताप; म्हणाली, “आधी ऑलिम्पिकसाठी…”

गेल्या १० दिवसांपासून भारतातील दिल्लीच्या बाजूस पाऊस सातत्याने पडत आहे. या सततच्या पावसामुळे ग्रेटर नोएडाचे मैदान पाण्याने भिजले होते. मैदान ओले असल्याने पहिल्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही तर नाणेफेकही झाली नाही. दुसऱ्या दिवसाच्या आदल्या रात्री पुन्हा मुसळधार पाऊस पडला, पण मैदानावरील कर्मचारी दुसऱ्या दिवशीही खेळपट्टी आणि मैदान कोरडे करू शकले नाहीत. या कारणास्तव दुसरा दिवसही रद्द घोषित करण्यात आला आहे. आतापर्यंत या सामन्यात नाणेफेकही झालेली नाही.