Afg vs Pak 1st T20 Match: सध्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन क्रिकेट संघांमध्ये तीन सामन्यांची टी-२० मालिका सुरु आहे. संयुक्त अरब अमीराती अर्थात यूएईमधील शारजाह स्टेडियममध्ये या मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. या सामन्यामध्ये अफगाणिस्तानच्या संघाने ६ गडी राखत पाकिस्तानचा पराभव केला आहे. या घटनेमुळे अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यामध्ये अफगाणिस्तानने पाकिस्तानवर विजय मिळवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मालिकेमधील पहिल्या सामन्यामध्ये पाकिस्तानने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. २० षटकांच्या खेळामध्ये पाकिस्तानच्या संपूर्ण संघाने फक्त ९२ धावा केल्या. २० व्या षटकाच्या शेवटी ९ बाद ९२ धावा असे धावफलकावर लिहिलेले होते. पाकिस्तान संघातील एकाही खेळाडूला २० पेक्षा जास्त धावा करणे शक्य झाले नाही. त्यातही सात जणांना एक अंकी धावसंख्येवर बाद झाले. इमाद वसीमने पाकिस्तानकडून सर्वाधिक १८ धावा केल्या. अफगाणिस्तानच्या फजल हक फारुकी, मुजीब उर रेहमान आणि मोहम्मद नबी यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

पुढे अफगाणिस्तानचा संघ फलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये उतरला. सतराव्या षटकामध्ये ४ गडी बाद असताना त्यांनी ९८ धावा करत पाकिस्तानला धूळ चारली. मोहम्मद नबीने मोठा षटकार मारत अफगाणिस्तानला विजय मिळवून दिला. त्याने संघाकडून सर्वाधिक ३८ धावा केल्या. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही क्षेत्राने त्यांनी चांगली कामगिरी केली. अफगाणिस्तानने ११ वर्षांमध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यामध्ये पाकिस्तानवर मात केली.

आणखी वाचा – IPL 2023: बीसीसीआय आयपीएल २०२४ च्या पर्वात बांगलादेश-श्रीलंकेच्या खेळाडूंवर घालणार बंदी? जाणून घ्या काय आहे कारण

शारजाहमध्ये झालेल्या सामन्यामध्ये पाकिस्तानच्या संघानेही काही लाजिरवाणे विक्रम प्रस्थापित केले. या संघाने टी-२० आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये पाचव्यांदा इतकी कमी धावसंख्या केली आहे. शिवाय टी-२० सामन्यांमध्ये १०० पेक्षा कमी धावा करण्याची पाकिस्तानची ही नववी वेळ आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Afg vs pak t20 afghanistan created history at sharjah beat pakistan in 1st time in international match yps
First published on: 25-03-2023 at 12:14 IST