Afghanistan : अफगाणिस्तानने वनडे वर्ल्डकप बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला ६ विकेट्सनी नमवत खळबळजनक विजयाची नोंद केली. शारजा इथे झालेल्या पहिल्या वनडेत अफगाणिस्तानने ( Afghanistan ) हा पराक्रम केला. अफगाणिस्तानचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिलाच विजय आहे.
दक्षिण अफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला पण..
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण अफगाणिस्तानच्या ( Afghanistan ) भेदक गोलंदाजीपुढे आफ्रिकेच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. विआन मुल्डरने ५२ धावांची खेळी करत आफ्रिकेचा डाव सावरला. एकाक्षणी दक्षिण आफ्रिकेची अवस्था ३६/७ अशी होती. मुल्डरने ५ चौकार आणि एका षटकारासह अर्धशतक खेळी केली. ब्युऑन फॉर्च्युनने १६ धावा करत त्याला चांगली साथ दिली.
हे पण वाचा- AFG vs NZ Test : ९१ वर्षात प्रथमच… कसोटी सामना एकही चेंडू न टाकता झाला रद्द! जाणून घ्या इतिहास
अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची कमाल कामगिरी
अफगाणिस्तानतर्फे ( Afghanistan ) फझलक फरुकीने ४ तर गनफझरने ३ विकेट्स घेत आफ्रिकेच्या डावाला खिंडार पाडलं. अनुभवी रशीद खानने २ विकेट्स घेतल्या. छोटेखानी लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरुवातही डळमळीत झाली. पण गुलबदीन नईबने नाबाद ३४ तर ओमरझाईने नाबाद २५ धावांची खेळी करत अफगाणिस्तानला थरारक विजय मिळवून दिला.
अफगाणिस्तानने गेल्या दोन वर्षात पाकिस्तान, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि आता दक्षिण आफ्रिकेला चीतपट केलं आहे. गेल्या आठवड्यात ग्रेटर नोएडा इथे आयोजित न्यूझीलंड-अफगाणिस्तान कसोटी सामना पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला होता. ती निराशा बाजूला सारत अफगाणिस्तानने विक्रमी विजय मिळवला. फझलक फरुकीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.या विजयासह अफगाणिस्तानने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.