जगातील सर्वात चपळ यष्टीरक्षक कोण? हा प्रश्न विचारल्यानंतर बहुतांश क्रिकेटप्रेमी भारताच्या महेंद्रसिंग धोनीचं नाव घेतात. वयाची पस्तीशी ओलांडूनही तो तितक्याच चपळाईने यष्टिरक्षण करतो. क्रिकेट जगतामध्ये महेंद्रसिंग धोनीचे एक अढळ स्थान आहे. यष्टीरक्षक म्हणूनही धोनीचा लौकिक आहे. मात्र धोनीसारखीच चपळाई अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक मोहम्मद शेहझादनेही दाखवली आहे.
बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये (BPL) शेहझादने एका सामन्यात Dhoni Style रन आऊट केला. त्याचा व्हिडीओ वायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Watch “ShahzadDhoniNoLook_edit_1” on #Vimeo https://t.co/fyUisMVsle
— Sports Freak (@SPOVDO) January 31, 2019
चितगांव वायकिंग्स आणि ढाका डायनामाइट्स यांच्यामध्ये हा सामना रंगला होता. या सामन्यात शेहझादने मिजानुर रहमानला रन आऊट केले. त्याच्या बॅटला चेंडू लागला आणि चेंडू स्टंपकडे येऊ लागला. त्यावेळी चपळाई दाखवत त्याने रहमानला रन आऊट केले. त्याची बाद करण्याची पद्धत पाहून अनेकांना धोनीने आधी केलेला रन आऊट आठवला.