३ दिवसांवर क्रिकेट सामना येऊन ठेपला असतांना खेळाडूंची क्रिकेट किट चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. ऑस्ट्रेलियाच्या देशांतर्गत क्रिकेट संघ क्वीन्सलँडच्या बाबतीतही असे घडले आहे. या आठवड्यात गुरुवारी अ‍ॅडलेड ओव्हल येथे शेफील्ड शील्ड सामन्यात तो तस्मानियाशी सामना करणार होता. पण या सामन्याआधीच संघाच्या व्हॅनमधून अनेक खेळाडूंचे क्रिकेट किट चोरीला गेले. क्वीन्सलँड संघाने याबाबत पोलिसांकडे तक्रार केली असून चोरट्यांचा शोध सरु आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्वीन्सलँड संघाचा यष्टीरक्षक फलंदाज जिमी पियर्सनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चोरीशी संबंधित एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये टीमची व्हॅन उभी दिसते आणि तिची काच तुटलेली दिसते. या व्हॅनमधून खेळाडूंचे किट चोरीला गेले आहे. हे चित्र शेअर करताना जिमीने लिहिले की मी त्याच्या दुर्दैवी लोकांपैकी एक आहे, ज्याने त्याच्या दोन नवीन बॅट गमावल्या. जर कोणी  अ‍ॅ डलेडमध्ये दोन नवीन बॅट बघितल्या तर कृपया मला कळवा. टीमची व्हॅन हॉटेलच्या पार्किंगच्या बाहेर उभी होती आणि चोरांनी संधी साधून किट बॅगवर हात साफ केला. 

क्वीन्सलँड संघाच्या तक्रारीनंतर दक्षिण ऑस्ट्रेलिया पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. चोरट्यांचा माग काढण्यासाठी हॉटेलमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची छाननी केली जात आहे. शेफिल्ड शील्ड गतविजेता क्वीन्सलँड या मोसमाच्या मोहिमेची सुरुवात गुरुवारी तस्मानियाविरुद्ध करेल. हा सामना ब्रिस्बेनमध्ये फक्त २८ सप्टेंबरला खेळला जाणार होता. पण वाढत्या करोनामुळे सामना झाला नव्हता. 

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After 3 days the team has to play the match thieves blew away players cricket kit srk
First published on: 04-10-2021 at 16:01 IST