Virender Sehwag Reveals About ODI World Cup 2007: माजी भारतीय खेळाडू वीरेंद्र सेहवागने २००७ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्याने स्वतःला दोन दिवस बंद का ठेवले होते ते सांगितले. त्या विश्वचषकात टीम इंडियाला लीग स्टेजमधून बाहेर पडावे लागले होते. स्पर्धेतील पहिला सामना बांगलादेशविरुद्ध संघ हरला होता. विश्वचषकाच्या साखळी फेरीतून बाहेर पडल्यानंतर भारतीय संघाकडे परतण्यासाठी दोन दिवस तिकीटही नव्हते.

भारताकडे सर्वोत्तम एकदिवसीय संघ होता –

बांगलादेशविरुद्धचा पहिला सामना गमावल्यानंतर संघाने दुसऱ्या सामन्यात बर्म्युडाचा पराभव केला होता. मात्र, त्यानंतर टीम इंडियाला तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. अशा प्रकारे संघाला साखळी सामन्यांमधून बाहेर व्हावे लागले. ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स’ या यूट्यूब शोमध्ये सेहवागने या सर्व गोष्टींचा खुलासा केला. त्यावेळी भारताकडे सर्वोत्तम एकदिवसीय संघ होता, असेही तो म्हणाला.

Anant Radhika's Pre-Wedding Ceremony Updates in Marathi
MS Dhoni : माही साक्षीसह अनंत राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी जामनगरला रवाना, VIDEO होतोय व्हायरल
Irfan Pathan raise question on BCCI about Hardik Pandya
Team India : ‘हे सर्वांना लागू होत नसेल, तर…’, इरफान पठाणकडून बीसीसीआयच्या केंद्रीय करारावर प्रश्न उपस्थित
Hockey India CEO Elena Norman resigns after nearly 13-year stint
Elena Norman : एलेना नॉर्मन यांचा हॉकी इंडियाच्या सीईओ पदाचा राजीनामा, १३ वर्षांच्या कार्यकाळानंतर घेतला निर्णय
Sarfaraz Khan's Cricket Journey
Sarfaraz Khan : ‘…तर रेल्वेमध्ये कपडे विकायला जाऊ शकतो’, सर्फराझच्या वडिलांना आठवला ‘तो’ भावनिक प्रसंग

म्हणून हे अधिक दुखावणारे होते –

या शोमध्ये बोलताना वीरेंद्र सेहवाग म्हणाला, “२००७ चा एकदिवसीय विश्वचषक सर्वात दुखावणारा होता. कारण २००७ मध्ये आमचा संघ सर्वोत्तम संघ होता. कागदावर चांगला संघ शोधायला गेला, तर वर्ल्डकपच्या आधी किंवा नंतर असा संघ सापडणार नाही. गेल्या हंगामातही आम्ही फायनल खेळलो, पुढच्या आवृत्तीत आम्ही विश्वचषक जिंकला, पण तो संघ नव्हता. त्यामुळे हे अधिक दुखावणारे होते. कारण आम्ही तीन पैकी दोन सामने गमावले होते आणि आम्ही बाहेर पडलो होतो.”

हेही वाचा – WTC Final 2023: कॅमेरून ग्रीनने अंतिम सामन्यापूर्वी रोहित शर्माचे केले कौतुक; म्हणाला, “आयपीएलमध्ये खूप काही…”

वीरेंद्र सेहवाग पुढे म्हणाला, “तुम्हाला माहित आहे का? यापेक्षा जास्त दु:ख कशाचे झाले होते. प्रत्येकाला वाटले की भारत पुढच्या फेरीत जाईल आणि मग जेव्हा साखळी सामन्यांची फेरी संपली, तेव्हा दोन दिवसांचा ब्रेक होता. मग त्यानंतर आम्हाला परत यायचं होतं. पण आम्ही हरलो तेव्हा आमच्याकडे तिकिटे नव्हती. त्यामुळे आम्हाला त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये आणखी २ दिवस थांबावे लागले. त्यावेळी आमच्याकडे सराव करणे किंवा इतर कोणतेही काम नव्हते.”

हेही वाचा – Virender Sehwag: “आता माझे केस शोएब अख्तरच्या…”, पाकिस्तानच्या माजी खेळाडूला वीरेंद्र सेहवागने दिले चोख प्रत्युत्तर

त्यामुळे वीरेंद्र सेहवागने स्वत:ला दोन दिवस बंद करु घेतले होते. सेहवाग पुढे म्हणाला, “माझ्या रूममध्ये रूम-सर्व्हिस करणारे लोक नव्हते, घरकाम करणाऱ्या लोकांना बोलावले नव्हते. मलाही बाहेर जाता येत नव्हते. मला कोणाचा चेहराही दिसला नाही.”