scorecardresearch

IND vs AUS, World Cup 2023: फायनल हारल्यानंतर कुलदीप यादवच्या घराबाहेर पोलिसांची गस्त, VIDEO होतोय व्हायरल

Cricket World Cup 2023, IND vs AUS Final: अंतिम सामना खेळणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूंबद्दल चाहत्यांनी कोणतीही नाराजी दाखवू नये. यासाठी पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे. कानपूरमधील डिफेन्स कॉलनीत राहणाऱ्या कुलदीप यादवच्या घराबाहेर पोलीस निरीक्षक आणि हवालदारांनी गस्त सुरू केली आहे.

Ind vs AUS Australia Won One Day World Cup 2023 in Marathi
कुलदीप यादवच्या घराबाहेर पोलीस निरीक्षक आणि हवालदारांनी गस्त सुरू (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Police has started patrolling outside the house of Kuldeep Yadav: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा अंतिम सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाल्याने देशातील अनेक ठिकाणी चाहते प्रचंड संतापले आहेत. टीम इंडियाने हा सामना एवढा गांभीर्याने घेतला नसल्याचे त्यांना वाटते. फक्त अंतिम फेरी गाठण्यापर्यंत गांभीर्य दाखवून दिले आहे, असे काही चाहत्यांचे मत आहे. त्यामुळेच टीम इंडियाला अंतिम सामन्यात मोठी धावसंख्या उभारता आली नाही. देशात अनेक ठिकाणी क्रिकेट चाहते संताप व्यक्त करत आहेत. त्यामुळे कानपूरमधील डिफेन्स कॉलनीत राहणाऱ्या कुलदीप यादवच्या घराबाहेर पोलिसांनी गस्त घालण्यास सुरुवात केली आहे.

अशात अंतिम सामना खेळणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूंबद्दल चाहत्यांनी कोणतीही नाराजी दाखवू नये. यासाठी पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे. कानपूरमधील डिफेन्स कॉलनीत राहणाऱ्या कुलदीप यादवच्या घराबाहेर पोलीस निरीक्षक आणि हवालदारांनी गस्त सुरू केली आहे. सामना हरल्यानंतर कुलदीप यादवच्या घरात शांतता आहे. घरातून कोणीही बाहेर पडत नाही. एका स्थानिक वृत्तवाहिनीने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये कुलदीपच्या घराबाहेर दोन पोलीस तैनात केलेले दिसतात. दोन पोलीस गेटबाहेर सतर्क उभे आहेत.

nigerian citizen escaped from police custody, navi mumbai police raid, nigerian citizen arrested for drugs smuggling in navi mumbai
Video : नवी मुंबई पोलिसांची बेफिकरी आणि चपळता, दोन्हींचे उदाहरण एकाच वेळी….बघा नक्की काय घडलं
israel war hamas terrorist
“ना मोहीम, ना गोळीबार…हे युद्ध आहे”, हमासच्या हल्ल्यानंतर नेतान्याहूंनी ठणकावलं; म्हणाले, “त्यांनी कल्पनाही केली नसेल अशी…!”
ias- rinku-dagga-compulsory-retired
पाळीव कुत्र्याला फेरफटका मारण्यासाठी आख्खं स्टेडियम रिकामं करायला लावणं भोवलं; महिला IAS अधिकाऱ्याला निवृत्तीचे आदेश!
flood in Nagpur
नागपूर : पुरात अडकलेल्या माय-लेकीला वाचवण्यासाठी ‘तिने’ लावली जिवाची बाजी

कुलदीप यादवच्या घराबाहेर पोलिसांची गस्त –

कुलदीप यादवच्या घराभोवती कोणत्याही संतप्त चाहत्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करु नये, म्हणून पोलिसांना आधीच सतर्क करण्यात आले आहे. कारण दिवसभरात शहरातील अनेक क्रिकेटप्रेमी कुलदीपच्या घराबाहेर पोहोचले होते. प्रसारमाध्यमांचाही गराडा होता.

पोलिसांनी दिली माहिती –

जाजमाऊ पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरविंद सिसोदिया यांनी सांगितले की, सतर्कतेसाठी कुलदीप यादवच्या घराबाहेर गस्तीवर पोलिसांना पाठवण्यात आले आहे. आतापर्यंत कोठूनही कोणत्याही प्रकारचा निषेध किंवा विरोध व्यक्त केल्याचे पुरावे मिळालेले नाहीत. घरच्यांनीही आमच्याकडून अशी कोणतीही सुरक्षा मागितली नाही. तरीही ही आमची गस्त सुरु आहे. कुलदीपच्या घराबाहेर आमचे पोलिस पथक हजर आहे.

हेही वाचा – IND vs AUS Final: ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्स यांनी ‘गल्ली क्रिकेट’ खेळण्यााचा घेतला आनंद, पाहा VIDEO

कुलदीप यादवची अंतिम सामन्यातील कामगिरी –

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २४० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया संघाने ४३ षटकांत ४ गडी गमावून २४१ धावांचे पूर्ण केले. या सामन्यात कुलदीप यादव फलंदाजी करताना १८ चेंडूत १० धावा काढून नाबाद राहिला. त्याचबरोबर लक्ष्याचा बचाव करताना त्याने १० षटकांत ५६ धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: After losing the final the police has started patrolling outside the house of kuldeep yadav in defense colony kanpur vbm

First published on: 20-11-2023 at 18:55 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×