scorecardresearch

WPL 2023 Final MI vs DC: विजेतेपद पटकावल्यानंतर हरमनप्रीत कौरने दिली महत्वाची प्रतिक्रिया; म्हणाली, “आम्ही खूप दिवसांपासून…”

Harmanpreet Kaur Statement: महिला प्रीमियर लीगच्या इतिहासात मुंबई इंडियन्सने पहिले विजेतेपद पटकावले. त्यानंतर हरमनप्रीत कौर म्हणाली, हा क्षण आमच्यासाठी खूप दिवसाचे स्वप्न झाल्यासारखा आहे.

WPL 2023 Final MI vs DC Harmanpreet Kaur Statement
हरमनप्रीत कौर (फोटो- ट्विटर)

Harmanpreet Kaur says long time dream come true: मुंबई इंडियन्सच्या संघाने महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्राचे विजेतेपद पटकावले आहे. त्याने रविवारी (२६ मार्च) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सचा सात गडी राखून पराभव केला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत नऊ गडी गमावून १३१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईने १९.३ षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात १३४ धावा करून सामना जिंकला. यानंतर हमनप्रीत कौरने आपली प्रतिक्रिया दिली

अनेक वर्षांचे स्वप्न आज पूर्ण झाले –

मुंबई इंडियन्सच्या विजेतेपदानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली, “ते (डब्ल्यूपीएल) आम्हा सर्वांसाठी एक उत्तम अनुभव होता, आम्ही इतक्या वर्षांपासून या क्षणाची वाट पाहत होतो.मला वाटते की आमच्या ड्रेसिंग रूममधील प्रत्येकाने त्याचा आनंद घेतला.” विजेतेपद जिंकल्यानंतर तिचा वैयक्तिक अनुभव शेअर करताना हरमनप्रीत म्हणाली, “हे माझ्यासाठीच नव्हे तर आपल्या सर्वांसाठी, अगदी मैदानावर गर्दी करणाऱ्या चाहत्यांसाठीही हे स्वप्न पूर्ण झाले आहे. लोक आम्हाला विचारायचे की डब्ल्यूपीएल कधी येणार आहे? आणि आज तो दिवस आला आहे. त्यामुळे मला खूप आनंद आणि अभिमान वाटतो की, आमच्या टीमने इतकी चांगली कामगिरी केली.”

सर्व खेळाडूंनी जबाबदारी घेतली –

आपल्या संघातील खेळाडूंचे कौतुक करताना, हरमनप्रीत कौर म्हणाली, “जेव्हा तुमची फलंदाजीची फळी इतकी लांब असते, तेव्हा तुम्हाला मैदानात जाऊन स्वतःला सिद्ध करण्याची गरज असते. यावर आम्ही ड्रेसिंग रूममध्ये चर्चा करत होतो. मी खरोखर आनंदी आहे की, प्रत्येकाने जबाबदारी घेतली. तसेच आम्ही जे ठरवले होते, ते मैदानावर जाऊन केले.”

हेही वाचा – WPL 2023 Final MI vs DC: मुंबई इंडियन्सने रचला इतिहास, दिल्लीला हरवून बनली पहिली चॅम्पियन, पाहा सेलिब्रेशनचा VIDEO

यशामागे सकारात्मक दृष्टिकोन हा सर्वात मोठा घटक –

अंतिम फेरीतील संघाच्या कामगिरीवर भाष्य करताना हरमन म्हणाली, “आमच्या संघाच्या यशामागे सकारात्मक दृष्टिकोन हा सर्वात मोठा घटक आहे. आज आम्ही ज्या पद्धतीने सुरुवात केली, ती विलक्षण होती. आजचा दिवस आमच्यासाठी खूप चांगला होता. आज आम्ही थोडे भाग्यवान देखील होतो. कारण आम्ही भरपूर चेंडू फुल टॉस टाकले होते, परंतु सर्व काही आमच्या बाजूने गेले. जेव्हा तुम्ही मैदानावर जाता तेव्हा तुम्हाला जे अपेक्षित असते आणि आज तेच घडले.”

हेही वाचा – WPL 2023 Prize Money: ऑरेंज कॅपपासून पर्पल कॅपपर्यंत, जाणून घ्या कोणाला कोणता पुरस्कार मिळाला, पाहा संपूर्ण यादी

आता विजयानंतर कसे वाटते ते मी अनुभवू शकते –

तुमच्या कारकिर्दीतील हा सर्वात मोठा विजय आहे का? याला उत्तर देताना हरमनप्रीत म्हणाली, “हा आपल्या सर्वांसाठी एक खास क्षण आहे, आणि मी या क्षणाची खूप दिवसांपासून वाट पाहत होतो. आज मी अनुभवू शकते की विजयानंतर कसे वाटते.” या विजयाबद्दल मुंबई इंडियन्सच्या सपोर्ट स्टाफचे आभार मानताना हरमनप्रीत म्हणाली, “मला या विजयाचे श्रेय सपोर्ट स्टाफच्या सर्व सदस्यांना द्यायला हवे. माझ्यासाठी तो खूप छान अनुभव होता. आता मी पुढच्या हंगामाची वाट पाहत आहे.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 11:32 IST

संबंधित बातम्या