न्यूझीलंड पाठोपाठ आता इंग्लंडनंही आपला पाकिस्तान दौरा रद्द केला आहे. आतापर्यंत दहशतवाद्यांना पाठिंबा देणं पाकिस्तानच्या चांगलंच अंगलट आहे. आता सुरक्षेच्या कारणास्तव इंग्लंडने दौरा रद्द केल्याने पाकिस्तानची जगात नाचक्की झाली आहे. इंग्लंड पुरूष आणि महिला संघ पाकिस्तानचा दौरा करणार होते. इंग्लंडचा संघ १६ वर्षानंतर पाकिस्तान दौरा करण्यास तयार झाला होता. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव इंग्लंडने दौरा रद्द केला आहे. इंग्लंडचा संघ येथे फक्त दोन टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी येणार होता. हे दोन सामने १३ आणि १४ ऑक्टोबर रोजी होणार होते. त्यानंतर महिला संघाचा दौरा होणार होता. यावेळी तीन एकदिवसीय सामन्याची मालिका खेळली जाणार होती.

“इंग्लंडने पाकिस्तान दौरा रद्द करण्याचं निश्चित केलं आहे. त्यामुळे पुरुष आणि महिला क्रिकेट संघाचा ऑक्टोबरमध्ये होणारा पाकिस्तान दौरा रद्द करण्यात आला आहे.”, असं ट्वीट इंग्लंड क्रिकेट बोर्डाने केलं आहे.

“इंग्लंडच्या निर्णयामुळे मी नाराज आहे. त्याने आपल्या वचनाचे पालन केले नाही. क्रिकेट कुटुंबातील सदस्याच्या मदतीकडे पाठ फिरवली जेव्हा त्याला सर्वात जास्त गरज होती. यामधून आपण नक्कीच बाहेर पडू. पाकिस्तानने जगातील सर्वोत्तम संघ बनणे हेच उत्तर असेल. जेणेकरून संघ त्यांच्याविरुद्ध खेळणे टाळण्यासाठी निमित्त करू शकणार नाहीत.”, असं ट्वीट पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नवनियुक्त अध्यक्ष रमीज राजा यांनी केलं आहे.

यापूर्वी न्यूझीलंड क्रिकेट संघ तब्बल १८ वर्षानंतर पाकिस्तानात क्रिकेट सामने खेळणार होता. मात्र पुन्हा एकदा सुरक्षेचं कारण देत दौरा स्थगित केल्याचं न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. शेवटच्या क्षणी न्यूझीलंडने माघार घेतल्याने पाकिस्तानची नाचक्की झाली. न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघात तीन एकदिवसीय आणि पाच टी २० सामन्यांची मालिका खेळली जाणार होती.

रनआऊट झाल्यानंतर बॅट्समननं आपल्याच सहकाऱ्याच्या तोडांवर फेकली बॅट..! VIDEO पाहून तुम्हालाही येईल हसू

मार्च २००९ मध्ये लाहोरच्या स्टेडियमबाहेर कसोटी सामना खेळण्यासाठी आलेल्या श्रीलंका संघावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. ज्यात श्रीलंकेचे खेळाडू जखमी झाले होते. दुसरीकडे, न्यूझीलंडचा संघही पाकिस्तान मालिका खेळण्यासाठी येत होता. मात्र किवी संघाला श्रीलंका संघावर लाहोरमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला झाल्याचं समजताच, ते अर्ध्यावरून मायदेशी परतलो होते.