शुक्रवारी सकाळी झालेल्या कार अपघातात ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. तो सध्या धोक्याबाहेर आहे, परंतु दुखापत गंभीर आहे, जी पूर्णपणे बरी होण्यास वेळ लागेल. भारतातील प्रत्येकजण पंतच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानमध्येही प्रार्थना केल्या जात आहेत.

यामध्ये शोएब मलिक, मोहम्मद हाफीज, हसन अली यांच्यासह अनेक पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये केवळ खेळाडूच नाही तर पाकिस्तानचे लोकही प्रार्थना करत आहेत. अशा प्रकारे ऋषभ पंतच्या आरोग्यासाठी जगभरातून प्रार्थना केल्या जात आहेत.

Jammu Kashmir Gulmarg fire viral video
हॉटेलला लागलेली आग विझवण्यासाठी स्थानिकांचा भन्नाट जुगाड! Video पाहून नेटकरी म्हणाले, “अरे रे…”
Pakistani flight attendants
पाकिस्तानी एअर होस्टेस अचानक देश का सोडतायत? कॅनडामध्ये आश्रय घेण्याची कारणे काय?
security guards daughter graduates from uk college celebrities react emotional viral video
“अशक्यही शक्य करतो तो बाप!” सुरक्षा रक्षकाने लेकीला शिक्षणासाठी पाठवले परदेशात; सेलेब्सने केले कौतुक, Video Viral
sunil gavaskar supports rohit sharma
कसोटी क्रिकेटसाठी दृढनिश्चय आवश्यक! रोहित शर्माच्या वक्तव्याचे गावस्करांकडून समर्थन

शोएब मलिकने ट्विट करून लिहिले की, ”आताच ऋषभ पंतच्या अपघाताची माहिती मिळाली. तुझ्यासाठी अनेक आशीर्वाद. लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा. भाऊ लवकर बरा हो.”

आणखी वाचा – “पंतनेच Google ला त्याचं नाव टाकून आम्हाला दाखवलं अन् त्यानंतर…; रुग्णालयात घेऊन गेलेल्या तरुणांनी सांगितला घटनाक्रम

दुसरीकडे पाकिस्तानी खेळाडू हसन अलीने ट्विट करताना लिहले, ”मला आशा आहे की काहीही गंभीर नाही. पंत लवकर बरा व्हावा अशी माझी इच्छा आहे. इन्शाअल्लाह तू बरा होऊन लवकरच मैदानात परतशील.”

पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू मोहम्मद हाफीजने ट्विट करत पंतच्या तंदुरुस्तीसाठी प्रार्थना केली आहे.

पाकिस्तान संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने ट्विट केले आहे. त्याने पंत लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली आहे.

पाकिस्तानचा खेळाडू शादाब खानने देखील पंतच्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

कार अनियंत्रित होऊन दुभाजकावर आदळली –

हेही वाचा – Rishabh Pant Car Accident: पंतला मैदानात परतण्यासाठी लागणार ‘इतका’ कालावधी; पाहा, काय म्हणाले डॉक्टर

शुक्रवारी सकाळी कुटुंबासह नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी घरी जात असताना पंतचा अपघात झाला. दिल्ली-डेहराडून महामार्गावर रुरकीजवळ त्यांची कार अनियंत्रित झाल्याने दुभाजकावर जाऊन आदळली. यामुळे त्याची कार उलटली आणि तिने पेट घेतला. या मोठ्या अपघातात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज पंत थोडक्यात बचावला. त्याची प्रकृती स्थिर आहे. पंतच्या अपघाताने क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे.