यूरो कपमध्ये कोका कोलावर वक्री दृष्टी पडल्यानंत आता Heineken बियरवर सुद्धा ही वेळ आली आहे. रोनाल्डोनंतर आता फ्रान्सचा मिडफिल्डर पॉल पोगबाने एका पत्रकार परिषदेदरम्यान टेबलावर ठेवलेली Heineken बियरची बाटली काढली आणि खाली ठेवली. पोगबाच्या या कृत्याने उपस्थित लोकांमध्ये काही वेळ संभ्रमावस्था निर्माण झाली. यूरो कप २०२० स्पर्धेसाठी कोका कोला आणि Heineken अधिकृत प्रायोजक आहेत. त्यामुळे खेळाडूंच्या या कृत्यामुळे आयोजकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. काही जण या कृत्याचं कौतुक करत आहेत. तर काही जण यावर टीका करत आहेत. जर्मनी विरुद्धचा सामना संपल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत पॉलने समोर ठेवलेली बाटली हटवली होती. रोनाल्डोची कृती कोका कोला कंपनीला मोठी महागात पडली असून शेअर्स १.६ टक्क्यांनी खाली घसरले होते. मात्र Heineken बियरसोबत याच्या उलट झालं. Heineken बियरचा शेअर १.७ टक्क्यांनी वाढला आहे.

यूरो कप २०२० स्पर्धेत ‘ग्रुप ऑफ डेथ’ अशी ओळख असलेल्या ‘फ’ गटात हंगेरीविरोधात होणाऱ्या सामन्याआधी रोनाल्डो पत्रकार परिषदेसाठी आला होता. यावेळी आपल्यासमोर कोका कोलाच्या दोन बाटल्या ठेवल्याचं त्याने पाहिलं. त्याने त्या बाटल्या बाजूला केल्या आणि तिथे असलेली पाण्याची बाटली हातात घेऊन ‘पाणी’ असं म्हणत एकाप्रकारे पाणी पिण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केलं.

यूरो कप २०२०: कोका कोलावर वक्रदृष्टी; रोनाल्डोनंतर इटलीच्या लोकेटेलीने बाटल्या हटवल्या

रोनाल्डोची ही एक कृती कोका कोला कंपनीला मोठी महागात पडली असून शेअर्स १.६ टक्क्यांनी खाली घसरले आणि तब्बल चार बिलियन डॉलर्सचा तोटा सहन करावा लागला. कंपनीची किंमत २४२ बिलियन डॉलर्सवरुन २३८ वर आली