श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघ १६ धावांनी पराभूत झाला. उभय संघांतील हा सामना पुण्याच्या एमसीएस स्टेडियवर खेळला गेला असून भारत लक्ष्य गाठू शकला नाही. संघात रोहित शर्मा, विराट कोहली हे दिग्गज खेळत नसताना हार्दिक पांड्या कर्णधाराची भूमिका पार पाडत आहे. हार्दिकच्या नेतृत्वात भारताने पहिला टी२० सामना कसाबसा जिंकला, पण दुसऱ्या सामन्यात संघाला पराभव स्वीकारावा लागला.

हार्दिकने गुरुवारी (५ जानेवारी) या सामन्यात घेतलेले काही निर्णय संघाला महागात पडले. अशा प्रकारचे काही प्रश्न काल पुण्यातील पत्रकार परिषदेत प्रशिक्षक राहुल द्रविडला विचारण्यात आले. यावर त्याने पत्रकार परिषदेत पत्रकाराशी मराठीत संवाद साधला. द्रविडने मराठीत बोलण्यास सुरुवात केली, पण त्याने इंग्रजीत उत्तर देऊ का अशी विनंतीही पत्रकाराला केली. पत्रकाराने विनम्रपणे भारताच्या या दिग्गजाला मराठीत बोलणे सुरू ठेवण्याचे आवाहन केले, त्यानंतर द्रविडने विनोद केला. ”मी इंग्रजीत बोलतो. नाहीतर लोकांना समजणार नाही. मला  मराठी भाषा बोलता येते हे फारसे कोणाला माहित नाही, पण ठीक आहे,”असे द्रविड म्हणाला. यानंतर एकच हशा पिकला.

IPL 2024 Chennai Rajasthan Royals vs Gujarat Titans Match Updates in Marathi
IPL 2024: “असा विचार करू नका…” हर्षा भोगलेंना विजयानंतर शुबमन गिल नेमकं काय म्हणाला, पाहा व्हीडिओ
Ricky Ponting Argued With Umpire
IPL 2024 : राजस्थानविरुद्धच्या सामन्यात रिकी पाँटिंगने पंचाशी घातला वाद, काय होतं कारण? जाणून घ्या
IPL 2024 Gujarat Titans vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024 GT vs MI: पहिला सामना गमावल्यानंतर रोहितने सर्वांसमोरच हार्दिकला झापलं; आकाश अंबानी, राशीद खानही बघतच राहिले- पाहा VIDEO
IPL 2024 Gujarat Titans vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024 GT vs MI: …आणि रोहित शर्मा पंड्याला म्हणाला, “कोण? मी?”, हार्दिकच्या ‘या’ कृतीवर चाहत्यांचा संताप; पाहा नेमकं काय घडलं मैदानात!

राहुल द्रविडचा जन्म इंदूरचा आहे, परंतु तो लहानाचा मोठा झाला बंगळुरूमध्ये झाला. द्रविड हा मराठी भाषिक ब्राह्मण कुटुंबात वाढला आहे. पत्रकार परिषदेत राहुल द्रविड म्हणाला, ”या मैदानावर अनेक षटकार मारले जातात. असा इतिहास आहे.”

हार्दिकचा पांड्याचे नेमके चुकले कुठे?

हार्दिक पांड्या याने या दुसऱ्या टी२० सामन्यान नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पुण्यातील खेलपट्टी लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघासाठी प्रतिकूल असते, हे माहिती असून देखील हार्दिकने प्रणम गोलंदाजी घेतली. हार्दिक एकतर खेळपट्टी समजून घेण्यात कमी पडला असवा किंवा त्याने संघासाठी आव्हान म्हणून हा निर्णय घेतला असावा, जे त्याने मुंबईत पार पडलेल्या टी२० सामन्यात बोलून दाखवले होते. पण यावेळी हार्दिकचा हा निर्णय संघाला महागात पडला. श्रीलंका संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २० षटकांमध्ये २०६ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताला मात्र हे लक्ष्य गाठता आले नाही. भारतीय संघ २० षटकांमध्ये ८ बाद १९० धावांपर्यंत मजल मारू शकला.