scorecardresearch

Premium

IPL 2024: ‘बच्चे, इजी हो जा…’, नवीनशी झालेल्या भांडणानंतर ‘या’ पाकिस्तानी खेळाडूने विराटला केला होता मेसेज

Virat Naveen Controversy : अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचा स्टार इमाम-उल-हकने दावा केला होता की, जेव्हा विराट कोहलीचे आयपीएलमध्ये नवीन उल हकसोबत भांडण झाले होते, तेव्हा त्याचा सहकारी आगा अली सलमानने विराटला इन्स्टावर मेसेज केला होता.

Virat Naveen Controversy Updates in marathi
विराट आणि नवीनचा वाद (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Agha Ali Salman messaged Kohli on Instagram : आयपीएल २०२३ मध्ये विराट कोहली आणि अफगाणिस्तानचा नवीन उल हक यांच्यातील वाद खूप चर्चेत राहीला होता. आरसीबी आणि एलएसजी यांच्यातील सामन्यात विराट आणि नवीन यांच्यात वाद झाला होता. यानंतर विराटचा एलएसजीचा मार्गदर्शक गौतम गंभीरसोबतही वाद झाला. नुकत्याच झालेल्या विश्वचषकात विराट कोहली आणि नवीन उल हक पुन्हा एकदा आमनेसामने आले होते. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान चाहत्यांनी नवीनसमोर कोहली-कोहलीच्या घोषणा दिल्या. मात्र, विराट कोहली आणि नवीन उल हक यांनी एकमेकांना मिठी मारली आणि वाद संपवला. पण हा वाद झाला, तेव्हा पाकिस्तानचा खेळाडू आगा अली सलमानने विराटला इन्स्टावर मेसेज केला होता.

अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचा स्टार इमाम-उल-हकने दावा केला होता की, जेव्हा विराट कोहलीचे आयपीएलमध्ये नवीन उल हकसोबत भांडण झाले होते, तेव्हा त्याचा सहकारी आगा अली सलमानने विराटला इंस्टाग्रामवर मेसेज केला होता. इमाम म्हणाले, ‘हा वाद खूप व्हायरल झाला होता. भांडणानंतर आगा अली सलमानने विराट कोहलीला इंस्टाग्रामवर मेसेज केला आणि म्हणाला, ‘कोहली बच्चे इजी हो जा.’ म्हणजेच आगा सलमानने कोहलीला ‘बच्चे’ म्हटले होते. सलमानचे पदार्पण नुकतेच झाले आहे, तर कोहलीचे नाव महान खेळाडूंमध्ये येते. अशा परिस्थितीत सलमानचे हे बोलणे चाहत्यांना आवडले नाही.

Pakistani Singer Shazia Manzoor Slaps Co host on Live Show
पाकिस्तानी गायिकेला ‘हनिमून’ विषयी विचारला प्रश्न; लाइव्ह शोमध्येच होस्टच्या कानाखाली लगावली, पाहा धक्कादायक व्हिडीओ
Bayer Leverkusen beat Mainz in the Bundesliga football tournament in Germany
बायर लेव्हरकूसेन संघाचा विक्रम
blast southwestern Pakistan
मतदानादरम्यान पाकिस्तानच्या बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा भागात बॉम्बस्फोट, ४ जवानांचा मृत्यू
U19 World Cup 2024 Updates in marathi
U19 WC 2024 final: भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार अंतिम सामना? टीम इंडियाला मिळणार १८ वर्षांपूर्वीचा बदला घेण्याची संधी

नवीनने सांगितले की त्याच्या आणि विराटमधील भांडण कसे सोडवले गेले –

एलएसजीला दिलेल्या मुलाखतीत या घटनेबद्दल बोलताना नवीन उल हकने सांगितले की विराट कोहलीने त्यांच्यातील गोष्टी कशा सोडवल्या. विश्वचषक सामन्यादरम्यान झालेल्या संभाषणाबद्दल बोलताना नवीन म्हणाला, कोहलीने मला सांगितले की हे संपवूया. मी म्हणालो हो इथेच संपवूया. म्हणून आम्ही पुन्हा एकमेकांकडे बघून हसलो आणि गळा भेट घेतली. त्यानंतर कोहलीने मला सांगितले की, यानंतर चाहते तुला माझ्या नावाने चिडवणार नाहीत. यानंतर विराटनेही चाहत्यांना नवीनला पाठिंबा देण्यास सांगितले.

हेही वाचा – IND vs AUS: पाचव्या टी-२० सामन्यात पाऊस ठरणार खलनायक? एम. चिन्नास्वामी स्टेडियमची काय आहे आकडेवारी, जाणून घ्या

चाहत्यांनी नवीनला दिले होते प्रोत्साहन –

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, जेव्हा नवीनने इंग्लंडच्या जोस बटलरला बाद केले, तेव्हा चाहत्यांनी त्याला खूप प्रोत्साहन दिले होते. या सामन्यात अफगाणिस्तानने गतविजेत्या संघाविरुद्ध शानदार विजय नोंदवला होता. अफगाणिस्तानने गतविजेत्या इंग्लंडचा ६९ धावांनी पराभव करून विश्वचषक २०२३ मधील पहिला सामना जिंकला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: After virat and naveens argument agha ali salman messaged kohli on instagram and said child take it easy vbm

First published on: 03-12-2023 at 16:43 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×