scorecardresearch

Premium

Ghoomar Movie: वीरेंद्र सेहवागच्या तोंडून मुलाची स्तुती ऐकल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी मानले आभार, शेअर केला VIDEO

Virender Sehwag Praises Abhishek Bachchan: माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने व्हिडिओ शेअर करून अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर यांच्या ‘घूमर’ चित्रपटाचे कौतुक केले. यानंतर अभिनेते अमिताभ बच्चन यांनी वीरेंद्र सेहवागचे व्हिडीओ शेअर करुन आभार मानले.

Amitabh Bachchan Thanks Virender Sehwag
वीरेंद्र सेहवाग आणि अमिताभ बच्चन (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Amitabh Bachchan Thanks Virender Sehwag: बॉलिवूडमध्ये क्रिकेटवर अनेक सिनेमे बनले आहेत. महेंद्रसिंग धोनी, मिताली राज आणि मोहम्मद अझरुद्दीन यांसारख्या स्टार्सच्या बायोपिक बनवण्यात आल्या आहेत. घूमर हा या एपिसोडमधील नवीन चित्रपट आहे. भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागला अभिषेक बच्चन आणि सैयामी खेरचा हा चित्रपट आवडला. त्यांनी एक खास व्हिडिओ पोस्ट करून चित्रपटाचे कौतुक केले. त्याचबरोबर या चित्रपटातील अभिषेक बच्चनच्या अभिनयाचेही कौतुक केले. त्यानंतर दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी एक व्हिडीओ शेअर करत वीरेंद्र सेहवागचे आभार मानले.

वीरेंद्र सेहवागला आवडला घूमर चित्रपट –

अमिताभ बच्चन यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये वीरेंद्र सेहवाग घूमर चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहे. सेहवाग म्हणाला, “मी घूमर हा चित्रपट पाहिला, जो मला खूप आवडला. खूप दिवसांनी क्रिकेटशी संबंधित चित्रपट पाहिला. या चित्रपटात क्रिकेटसोबतच भावनाही आहेत. हा चित्रपट पाहून तुम्हाला समजेल की एखाद्या खेळाडूच्या आयुष्यातील संघर्ष काय असतो. विशेषत: दुखापतीतून पुनरागमन करणे किती कठीण आहे. मी अशा फिरकीपटूंचा आदर करत नाही, पण सियामीचा घूमर अप्रतिम आहे. ही भूमिका खूप अवघड होती.”

aarya ambekar sung special hindi version of swagathaanjali
कंगना रणौतच्या ‘चंद्रमुखी २’साठी मराठमोळ्या आर्या आंबेकरने गायलं आहे खास गाणं; गायिकेची पोस्ट चर्चेत
krk-vivek-agnihotri-vaccine-war
“द व्हॅक्सिन वॉरने ‘गदर २’ व ‘जवान’चे रेकॉर्ड…” प्रसिद्ध अभिनेत्याचा विवेक अग्निहोत्रींना टोमणा
Raima Sen trolled for doing the vaccine war
“मला लोकांनी अनफॉलो केलं,” रायमाने सांगितला ‘व्हॅक्सिन वॉर’मध्ये काम केल्यानंतरचा अनुभव; म्हणाली, “मी फक्त एक…”
bhagyashree patvardhan
Video परिणीती- राघव यांच्या संगीत सोहळ्यात अभिनेत्री भाग्यश्री यांनी केला राजस्थानी डान्स; कपड्यावरुन नेटकऱ्यांनी केलं ट्रोल म्हणाले…

वीरेंद्र सेहवाग बनला अभिषेक बच्चनचा चाहता –

त्याने व्हिडीओमध्ये पुढे म्हटले की, “तसे तर मी कोचचे कधीच ऐकत नाही, पण अभिषेक बच्चनने अशा प्रकारे अभिनय केला आहे की, तुम्ही त्याचे ऐकलेच पाहिजे.” वीरेंद्र सेहवगाकडून अभिषेक बच्चनचे कौतुक ऐकल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये वीरेंद्र सेहवागचे आभार मानले आहे. व्हिडीओ शेअर करताना अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, “सेहवाग जी.. तुम्ही इतक्या सोप्या शब्दात खूप मोठी गोष्ट सांगितलीत! माझी कृतज्ञता आणि आपुलकी.”

हेही वाचा – IND vs PAK: ‘…म्हणून २०२१ मध्ये टीम इंडियाचा पाकिस्तानकडून पराभव झाला’; शोएब अख्तरने केला खुलासा

अमिताभ बच्चन मुलाच्या चित्रपटाचे करतायत प्रमोशन –

अमिताभ बच्चन आपल्या मुलाच्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. ते चित्रपटाशी संबंधित व्हिडीओ शेअर करत आहे. वीरेंद्र सेहवाग व्यतिरिक्त त्यांनी क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांचा व्हिडीओ देखील शेअर केला, ज्याने चित्रपटाचे कौतुक केले. सैयामी खेर आणि अभिषेक बच्चन यांचा हा चित्रपट १८ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: After virender sehwag praised abhishek bachchans film ghoomar amitabh bachchan thanked him vbm

First published on: 18-08-2023 at 15:37 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×