scorecardresearch

भारताविरुद्ध सामना जिंकल्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूचं धोनीबाबत मोठं वक्तव्य, म्हणाला…

धोनीचा पाकिस्तानी क्रिकेटर्स सोबतचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.

भारताविरुद्ध सामना जिंकल्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूचं धोनीबाबत मोठं वक्तव्य, म्हणाला…

ICC T20 विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या मार्गदर्शकाची भूमिका बजावत असलेल्या महेंद्रसिंह धोनीने भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले. सामना संपल्यानंतर धोनीचा पाकिस्तानी क्रिकेटर्स सोबतचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. धोनीसमोर पाकिस्तानचे चार खेळाडू कर्णधार बाबर आझम, इमाद वसीम, शोएब मलिक आणि युवा वेगवान गोलंदाज शाहनवाज दहनी उभे असल्याचे दिसले. धोनी त्यांच्यासोबत आपले अनुभव शेअर करतांना दिसला. भारताने सामना गमावला असला तरी पाकिस्तानमध्ये भारतीय खेळाडूंची चर्चा आहे. 

भारताविरुद्ध सामना जिंकल्यानंतर पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज शाहनवाज दहनीने धोनीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. एक फोटो ट्विट करत दहनीने लिहले की, “पाकिस्तानच्या विजयाचा आनंद आणि स्वप्नातील खेळाडूला भेटल्याचा उत्साह आहे. महेंद्रसिंह धोनीला विसरता येत नाही.”


सामन्याआधी देखील धोनीशी बोलण्यासाठी पाकिस्तानचा युवा गोलंदाज शाहनवाज दहानीही हतबल झाला होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, दहानी धोनीशी बोलण्याचा प्रयत्न करते, ज्यावर माही प्रतिक्रिया देतो.

पाकिस्तानच्या कर्णधाराचं मोठं वक्तव्य

भारत पाकिस्तान सामन्या म्हटल्यावर तो रोमहर्षक होईल ही अपेक्षा रविवारी फोल ठरली आणि कोट्यावधी भारतीयांची निराशा झाली. आधी फलंदाजांच्या अपयशानंतर गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीचा फटका भारताला बसला. टी-२० विश्वचषकात रविवारी झालेल्या ‘अव्वल-१२’ फेरीतील सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी आणि १३ चेंडू राखून मानहानीकारक पराभव केला. भारताच्या या पराभावाला कारणीभूत ठरले ते पाकिस्तानी खेळाडू डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी, सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि कर्णधार बाबर आझम. मात्र या ऐतिहासिक विजयानंतर बाबर आझमने संघाला एक इशारा दिला.

बाबर म्हणाला, “प्लिज…”

या सामन्यानंतर संघाला मार्गदर्शन करताना कर्णधार बाबरने त्यांना विजयामुळे हुरळून न जाण्याचा सल्ला दिलाय. “या विजयानंतर आपण निश्चिंत राहणं आपल्याला परवडणारं नाही. गोलंदाजी असो फलंदाजी असो किंवा श्रेत्ररक्षण असो आपल्याला आपली १०० टक्के कामगिरी करायची आहे. एक संघ म्हणून आपण हा सामना जिंकलोय. आपण हा विजय आपल्या कुटुंबाबरोर नक्कीच साजरा करु पण यामुळे अगदी हुरळून जाता कामा नये,” असं बाबर म्हणाला. इतकच नाही तर खेळाडूंना अगदी गयावया करुन प्लिज म्हणत त्याने हूरळून न जाण्याचं आवाहन केलं. “प्लिज, मी तुम्हाला यासाठी विनंती करतोय असं समजा हवं तर. आपण आपल्या ध्येयापासून भटकता कामा नये,” असं बाबरने संघ सहकाऱ्यांना सांगितलं आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-10-2021 at 16:48 IST