बॅटसाठी धोनीची मेरठमध्ये भ्रमंती

मोठय़ा लढाईपूर्वी योद्धे शस्त्र परजून घेतात. प्रतिस्पध्र्याना धूळ चारण्यासाठी शस्त्रे अद्ययावत स्थितीत आणण्यासाठी लढाईपूर्वीचा कालखंड महत्त्वाचा असतो. भारतीय संघ काही दिवसांतच ऑस्ट्रेलियाच्या खडतर दौऱ्यावर जाणार आहे.

मोठय़ा लढाईपूर्वी योद्धे शस्त्र परजून घेतात. प्रतिस्पध्र्याना धूळ चारण्यासाठी शस्त्रे अद्ययावत स्थितीत आणण्यासाठी लढाईपूर्वीचा कालखंड महत्त्वाचा असतो. भारतीय संघ काही दिवसांतच ऑस्ट्रेलियाच्या खडतर दौऱ्यावर जाणार आहे. या महत्त्वपूर्ण दौऱ्यासाठी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने आपले शस्त्र अर्थात बॅट सर्वोत्तम असावी यासाठी तब्बल पाच तास खर्ची घातले आहेत.  दर्जेदार बॅट्सच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध मेरठला भेट देत धोनीने १२६० ग्रॅमच्या सहा बॅट खरेदी केल्याचे सूत्रांनी सांगितले. बॅटच्या आकाराइतकाच लाकडाच्या प्रतीबाबतही धोनी जागरूक असल्याचे धोनीने भेट दिलेल्या कंपनीतील कामगारांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ahead of australia tour ms dhoni goes bat hunting in meerut

ताज्या बातम्या