scorecardresearch

IND vs AUS 1st Test: ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का; २०० हून अधिक बळी घेणारा ‘हा’ प्रमुख गोलंदाज बाहेर

IND vs AUS Test Series: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील बॉर्डर गावसकर मालिकेला ९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण प्रमुख गोलंदाज दुखापतीशी लढत आहे.

first Test Josh Hazlewood will miss
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ (फोटो- संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ४ सामन्यांची कसोटी मालिका ९ फेब्रुवारीपासून भारतात सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपुरात होणार असून त्यासाठी दोन्ही संघांनी तयारी सुरू केली आहे. नागपुरात होणार्‍या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. खरे तर संघाचा अनुभवी गोलंदाज जोश हेझलवूड दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर जाऊ शकतो. त्याचवेळी तो दुसरा कसोटी सामनाही खेळणे कठीण दिसत आहे.

पायाला झालेली दुखापत, बरे होण्यासाठी लागणारा वेळ –

ऑस्ट्रेलियाचा अनुभवी गोलंदाज जोश हेझलवूड गेल्या महिन्यात सिडनी येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात जखमी झाला होता. यामुळे तो क्रिकेटपासून दूर आहे. भारताविरुद्धच्या मालिकेसाठी तो भारतात पोहोचला असला तरी तरीही तो खेळणे अवघड आहे.

रविवारी बंगळुरूमध्ये सराव सुरू होण्यापूर्वी तो म्हणाला की, ”मला पहिला कसोटी सामना खेळता येईल की नाही हे माहित नाही, पण दुसऱ्या कसोटीसाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. आम्ही सध्या वर्कलोड मॅनेजमेंट करत आहोत. मी चांगली गोलंदाजी करत होतो पण अचानक अकिलीसचा आजार हाताळू शकलो नाही.”

हेही वाचा – Sohail Khan: विराट-उमरानवर गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूची इरफानकडून एका शब्दातच बोलती बंद; म्हणाला, ”त्याला..”

जोश हेझलवूडच्या वक्तव्यावरून तो पहिला कसोटी सामना खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे, तर दुसरा सामनाही खेळण्याबाबत शंका आहे. जोश हेझलवूड खेळला नाही, तर त्याच्या जागी स्कॉट बोलंडला संधी मिळू शकते. हा त्याचा पहिला आशिया दौरा असेल ज्यात तो गोलंदाजी करताना दिसेल.

ऑस्ट्रेलिया संघ:

पॅट कमिन्स (कर्णधार), अॅश्टन आगर, स्कॉट बोलंड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, पीटर हँड्सकॉम्ब, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन, डेव्हिड वॉर्नर.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 12:05 IST