scorecardresearch

सरिता देवीवर एक वर्षाची बंदी

आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक स्वीकारण्यास नकार देणाऱया भारताच्या बॉक्सिंगपूट एल.सरिता देवीवर आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध संस्थेकडून (एआयबीए) बुधवारी एक वर्षाची बंदी घालण्यात आली.

सरिता देवीवर एक वर्षाची बंदी

आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक स्वीकारण्यास नकार देणाऱया भारताच्या बॉक्सिंगपूट एल.सरिता देवीवर आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध संस्थेकडून (एआयबीए) बुधवारी एक वर्षाची बंदी घालण्यात आली. तर, भारतीय संघाचे परदेशी प्रशिक्षक बी. आय. फर्नांडिझ यांच्यावर दोन वर्षांच्या बंदीचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
इन्चॉन येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत सरिता देवीने उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाच्या पार्क जिनावर वर्चस्व गाजविल्यानंतरही पंचांनी तिच्याविरोधात निकाल दिला होता. पंचाच्या या निर्णयाचा निषेध म्हणून सरिता देवीने कांस्य पदक स्वीकारण्यास नकार दिला होता. या घटनेची आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध संघटनेने गंभीर दखल घेत तिला यापूर्वी अनिश्चित काळासाठी निलंबित केले. तत्पूर्वी झालेल्या प्रकारावर सरिता देवीने बिनशर्त माफी देखील मागितलेली होती. तसेच खासदार सचिन तेंडुलकरने देखील सरिताप्रकरणी क्रिडा मंत्र्यांशी चर्चा केली होती. अखेर एआयबीएने सरिता देवीवर वर्षभराची बंदी घालण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर पुर्नविचार करण्याचे लेखी पत्र ‘एआयबीए’ला पाठविण्यात आल्याचे क्रिडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी सांगितले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-12-2014 at 02:05 IST

संबंधित बातम्या