आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) न्यूझीलंडचा मुंबईकर फिरकीपटू एजाज पटेलला डिसेंबर २०२१ मधील सर्वोत्तम खेळाडू म्हणून सन्मान बहाल केला आहे. एजाज पटेलने डिसेंबरमध्ये इतिहास रचला. पटेलने वानखेडे स्टेडियमवर भारताविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या एका डावात १० बळी घेण्याची अप्रतिम कामगिरी केली. ही कामगिरी करणारा तो जिम लेकर आणि अनिल कुंबळे यांच्यानंतरचा तिसरा गोलंदाज ठरला. डिसेंबरमध्ये त्याने फक्त एकच कसोटी सामना खेळला, ज्यामध्ये त्याने १६.०७च्या सरासरीने १४ बळी घेतले.

पटेलने भारताविरुद्ध पहिल्या डावात सर्व १० विकेट घेतल्या आणि त्यानंतर दुसऱ्या डावात सलामीवीर मयंक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजाराच्या विकेट्ससह चार विकेट घेतल्या. या सामन्यात पटेलची गोलंदाजी २२५/१४ अशी होती. एजाज पटेलच्या कामगिरीवर भाष्य करताना आयसीसी व्होटिंग अकादमीचे सदस्य जेपी ड्युमिनी म्हणाले, ”ऐतिहासिक कामगिरी. एका डावात १० विकेट्स घेणे ही एक कामगिरी आहे, जी साजरी करणे आवश्यक आहे. एजाजची कामगिरी हा एक विक्रम आहे, जो दीर्घकाळ स्मरणात राहील यात शंका नाही.”

Top 5 Oldest Player To Score A Century In IPL
IPL 2024 : रोहित शर्मासह ‘या’ पाच सर्वात वयस्कर खेळाडूंनी आयपीएलमध्ये झळकावलयं शतक, जाणून घ्या कोण आहेत?
Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
Rohit Sharma gifted special 200 jersey by Sachin Tendulkar
IPL 2024 : रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससाठी रचला इतिहास! सचिन तेंडुलकरकडून मिळालं खास गिफ्ट
Rashid Khan is 4 wickets away from creating history
IPL 2024 : मुंबईविरुद्ध राशिदला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी! गुजरातसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरणार पहिला गोलंदाज

भारताचा कसोटी सलामीवीर मयंक अग्रवाल आणि ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क यांना डिसेंबर २०२१मधील कामगिरीसाठी नामांकन देण्यात आले होते. पण एजाजने बाजी मारली.

हेही वाचा – वर्ल्डकप स्पर्धेतून अफगाणिस्तान संघ होणार बाद..! वाचा नक्की घडलंय काय

१० विकेट घेणाऱ्या एजाज पटेलच्या जबरदस्त कामगिरीनंतर त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. आयपीएलच्या पुढच्या मोसमाचा लिलाव लवकरच होणार आहे आणि अशा स्थितीत अनेक फ्रेंचायझींच्या नजरा एजाज पटेलवरही असतील. त्याचबरोबर पटेलनेही आयपीएलमध्ये खेळण्याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, ”जर मला संधी मिळाली तर मला भारतात आयपीएल खेळायला नक्कीच आवडेल. ही एक उत्तम स्पर्धा आहे, मला संधी मिळाली तर मी स्वतःला भाग्यवान समजेन.”