रहाणेने शेअर केला आपल्या चिमुकलीचा पहिला फोटो, तुम्ही पाहिलात का?

शनिवारी अजिंक्यची पत्नी राधिका हिने दिला चिमुकलीला जन्म

मोहम्मद शमी, रविंद्र जाडेजा यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर विराट कोहलीच्या भारतीय संघाने विशाखापट्टणम कसोटीत पाचव्या दिवशी विजय संपादन केला. दुसऱ्या डावात आफ्रिकेला विजयासाठी ३९५ धावांचे आव्हान भारतीय संघाने दिले होते. भारतीय गोलंदाजांनी एकाही आफ्रिकन फलंदाजाला खेळपट्टीवर स्थिरावण्याचा वेळ दिला नाही. आक्रमक गोलंदाजी करत भारताने आफ्रिकेचा डाव १९१ धावांत गुंडाळला आणि भारताला २०३ धावांनी विजय मिळवून दिला.

हा सामना सुरू असतानाच भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याला कन्यारत्नप्राप्ती झाली. त्याची पत्नी राधिकाने शनिवारी एका गोंडस मुलीला जन्म दिला. पण रहाणे त्याच्या मुलीच्या जन्माच्या वेळी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील पहिल्या कसोटी सामन्यात व्यस्त होता. त्यामुळे त्याला त्याच्या पत्नीकडे आणि मुलीकडे जाता आले नव्हते. पण हा सामना संपल्यानंतर रहाणे त्याच्या मुलीला आणि पत्नीला भेटला. त्याने सोशल मीडियावर पत्नी राधिका आणि मुलीबरोबरचा फोटो पोस्ट केला आहे.

हा फोटो पोस्ट करताना त्याने ‘हॅलो’ असे कॅप्शन टाकले आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तोच फोटो अजिंक्यची पत्नी हिनेही इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

Our bundle of joy is here

A post shared by Radhika Rahane (@radhika_dhopavkar) on

दरम्यान, रहाणे त्याच्या मुलीला भेटल्यानंतर पुन्हा १० ऑक्टोबरपासून पुण्यात सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील दुसऱ्या कसोटी सामन्याआधी भारतीय संघात सामील होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ajinkya rahane newborn baby daughter first photo with wife radhika vjb

ताज्या बातम्या