मागील काही महिन्यांपासून खराब फॉर्ममुळे भारतीय कसोटी संघातून अजिंक्य रहाणे बाहेर आहे. परंतु आता अजिंक्य रहाणेला आपला फॉर्म गवसला आहे. याचे संकेत त्याने रणजी ट्रॉफीमध्ये द्विशतक झळकावून दिले आहे. तसेच अजिंक्य रहाणेच्या भारताकडून खेळण्याची आशा अजूनही कायम आहे.

यादरम्यान त्यांनी एका रंजक पैलूबद्दलही सांगितले आहे, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि त्यांची फलंदाजीची सरासरी गेल्या तीन वर्षांत का घसरली हे रहाणेने स्पष्ट केले आहे. भारतीय खेळपट्ट्यांच्या स्वरूपामुळे गेल्या तीन वर्षांत त्याची फलंदाजीची सरासरी घसरली आहे, याकडे रहाणेने लक्ष वेधले.

MS Dhoni Only Given Limited Batting In CSK Trainer Explains Why
MS धोनीला शेवटच्याच षटकांमध्ये फलंदाजी देण्याचं कारण अखेरीस आलं समोर; प्रशिक्षक म्हणाले, “त्याचे शॉट्स..”
IPL 2024 Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीचा अद्भुत षटकार! संपूर्ण कारकिर्दीत माहीने पहिल्यांदाच लगावला भन्नाट शॉट; एबी-सूर्यालाही विसराल
Mayank Yadav Reveals About Fitness
IPL 2024 : सर्वात वेगवान चेंडू टाकणाऱ्या मयंक यादवच्या फिटनेसचं रहस्य काय? त्यानंच सांगितलं तो काय करतो?
list of fastest bowlers in IPL 2024 and whole History
उमरान मलिकचा विक्रम मोडणार मयंक यादव? IPL मधील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम कोणाच्या नावावर? पाहा यादी

इंडियन एक्सप्रेसशी बोलताना मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे म्हणाला, ”मी, कोहली आणि पुजाराने फलंदाज म्हणून कोणतीही चूक केली नाही. नंबर-३, नंबर-४ आणि नंबर-५ बद्दल बोलायचे तर तुम्हाला दिसेल की सर्व बॅटर्सची सरासरी खाली आली आहे. हे खेळपट्टीमुळे घडले आहे. त्यात फार चुका झाल्या आहेत, असे मला वाटत नाही. आपल्याकडून प्रत्येक वेळी चुका होतच असतात, असेही नाही. कधी-कधी खेळपट्टी अशा असतात, हे निमित्त नाही, पण भारतात कोणत्या प्रकारच्या खेळपट्ट्या आहेत हे सर्वांनी पाहिले आहे.”

मधल्या फळीसाठी अधिक आव्हान –

अजिंक्य म्हणाला की, ”मधल्या फळीतील फलंदाजांसाठी फलंदाजी करणे कठीण झाले आहे. सलामीवीरांना कठीण चेंडू मिळत असल्याने ते सोपे असते, पण जेव्हा एखादा फलंदाज बाद होतो. तेव्हा आपण विचार करतो की आपण कुठे चुकलो.” अजिंक्य रहाणे स्वत:बद्दल म्हणाला की, त्याला काहीही सिद्ध करायचे नाही, पण एक गोष्ट नक्की, मी कधीही हार मानणार नाही.

हेही वाचा – Flashback 2022: मोहम्मद हाफिजपासून ते रॉबिन उथप्पापर्यंत ‘या’ खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला केला अलविदा, पाहा कोण-कोण आहेत

३४ वर्षीय रहाणेने भारतासाठी ८२ कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी १७ गेल्या तीन वर्षांत खेळल्या आहेत. २०२०-२१ हंगामात १४ डावांमध्ये (८ कसोटी) त्याची सरासरी २९.२३ होती, तर २०२१ मध्ये ती नऊ डावांमध्ये (५ कसोटी) १९ इतकी घसरली. २०२१-२२ हंगामात आठ डावांमध्ये (४ कसोटी) त्याची सरासरी २१.८७ होती. २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियन दौऱ्यात त्याचे एकमेव शतक केले, तर गेल्या तीन वर्षांत दोन अर्धशतके केली आहेत.

हेही वाचा – ‘…म्हणून टीम इंडियाच्या कर्णधार पदासाठी धोनीच्या नावाची शिफारस केली होती’; सचिन तेंडुलकरचा मोठा खुलासा

रहाणेच्या बोलण्यात तथ्य आहे का?

अजिंक्य रहाणेने कामगिरी खाली येण्याबद्दल जे सांगितले आहे, जर तुम्ही आकडे बघितले तर ते अगदी बरोबर दिसते. २०१७ ते २०१९ या तीन वर्षात भारतातील नंबर-३ ते नंबर-५ फलंदाजांची कामगिरी पाहिली तर कोहलीने ३१ डावांमध्ये ४९ च्या सरासरीने सर्वाधिक १४५८ धावा केल्या. ५ शतके झळकावली. पुजाराने २९ डावात ४५ च्या सरासरीने १२६८ धावा केल्या आणि ६ शतके झळकावली. तर रहाणेने २६ डावात ४१ च्या सरासरीने ९८३ धावा केल्या. ज्यामध्ये 2 शतके आणि ७ अर्धशतके केली. कसोटीबद्दल बोलायचे झाले तर पुजारा नंबर-३ वर, कोहली नंबर-४ आणि रहाणे बहुतेक नंबर-५ वर खेळतो.