बाबांनी नेहमी स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं, अजिंक्यने शेअर केला बाबांसोबत लहानपणीचा फोटो

जगभरात साजरा केला जात आहे फादर्स डे

संपूर्ण जगभरात आज फादर्स डे साजरा केला जात आहे. प्रत्येक घरात वडिलांचं स्थान महत्वाचं मानलं जातं. आई आपल्या संपूर्ण कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्याचं काम करत असते, तर बाबा आपल्या परिवारातील सदस्यांना कोणताही त्रास होणार नाही…याची काळजी घेत असतात. प्रसंगी कठोर भूमिका घेत आपल्या मुलांना योग्य वळणावर आणण्यासाठी कडक भूमिका घेणारे बाबा प्रत्येकासाठी हिरो असतात. भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार आणि मुंबईकर क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेनेही आजच्या दिवशी आपल्या बाबांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आई आणि बाबांसोबतचा आपला लहानपणीचा फोटो शेअर करत अजिंक्यने, बाबांनी नेहमी आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं असं म्हटलं आहे.

आपल्याला क्रिकेटमध्ये करिअर घडवण्यासाठी प्रोत्साहन देण्यामागे वडिलांचा मोठा हात असल्याचं अजिंक्यने याआधी अनेक मुलाखतींमधून सांगितलं होतं. लहानपणी डोंबिवली ते मुंबई क्रिकेटसाठी सरावाला जात असताना बाबा फक्त पहिला दिवस आपल्यासोबत आले होते. यानंतर मला ट्रेनमध्ये एका डब्यात बसवून मी योग्य रितीने जातोय की नाही हे पाहण्यासाठी ते माझ्या पाठीमागून यायचे असं अजिंक्य म्हणाला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ajinkya rahane wishes his dad on eve of fathers day psd

ताज्या बातम्या