scorecardresearch

Premium

WTC Final IND vs AUS: बोटाच्या दुखापतीने त्रस्त अजिंक्य रहाणे, दुसऱ्या डावात फलंदाजी करणार की नाही? स्वत:च दिली अपडेट

WTC Final, India vs Australia Match Updates: ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या डब्ल्यूटीसी फायनलच्या तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणेला दुखापत झाली. फलंदाजीदरम्यान ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सचा चेंडू रहाणेच्या बोटाला लागला.

Ajinkya Rahane's Finger Injury
अजिंक्य रहाणे (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Ajinkya Rahane’s finger injury he will play in the second innings or not: लंडनमधील ओव्हल येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात डब्ल्यूटीसी स्पर्धेता अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्याचे तीन दिवस पार पडले आहेत. आतापर्यंत ऑस्ट्रेलिया सामन्यात आघाडीवर आहे. त्याचवेळी भारतीय संघाचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणेने भारताच्या पहिल्या डावात ८९ धावा करत संघाला २९६ धावांपर्यंत मजल मारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान पॅट कमिन्सच्या चेंडूमुळे त्याच्या बोटाला दुखापत झाली. रहाणेच्या या दुखापतीमुळे टीम इंडियाचा तणाव वाढू शकतो. कारण रहाणे दुसऱ्या डावात फलंदाजीला येणार की नाही हा प्रश्न आहे.

दरम्यान, स्वत: रहाणेने दुखापतीबाबत खुलासा केला आहे. पुढील डावात फलंदाजी करता येईल की नाही, हेही त्याने स्पष्ट केले. रहाणेने सामन्याच्या तिसऱ्या दिवसानंतर सांगितले की, “वेदना होत आहेत, पण बरी होण्यसारखी आहे. याचा माझ्या फलंदाजीवर परिणाम होईल असे वाटत नाही, मी ज्या प्रकारे फलंदाजी केली त्यामुळे आनंदी आहे. दिवस चांगला होता. आम्ही ३२०-३३० पर्यंत धावसंख्या उभारण्याकडे पाह होतो, परंतु एकूणच तो चांगला दिवस होता.”

asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
Old Malavani Aaji Writes Letter To Son After Ganpati Visit How Konkan Gets Lonely International Day Of Older Person Emotional
गणपतीला आलेला लेक, सून, नात मुंबईत निघून गेले, आणि मी पुन्हा वेडीच ठरले!
Sharad Pawar on Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakhe
शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरून वाद, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला काही…”
ajit pawar
‘दादा कचऱ्याची गाडी येत नाही’, भरकार्यक्रमात महिलेची तक्रार, अजित पवारांनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले…

भारतीय फलंदाज पुढे म्हणाला, “गोलंदाजीबद्दल बोलायचे तर आम्ही चांगली गोलंदाजी केली. सर्वांनी साथ दिली. रहाणे पुढे कॅमेरून ग्रीनच्या झेलबद्दल बोलताना म्हणाला, “तो एक चांगला झेल होता. तसेच तो एक चांगला क्षेत्ररक्षक आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्याची पोहोच मोठी आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया थोडी पुढे आहे.”

हेही वाचा – IND vs AUS WTC Final: केएस भरत पुन्हा एकदा अपयशी ठरल्याने चाहते संतापले, सोशल मीडियावर ट्रोल करताना म्हणाले…

रहाणे पुढे म्हणाला, “आमच्यासाठी या क्षणात असणे आणि सत्रानुसार खेळणे महत्त्वाचे आहे. दुसऱ्या दिवशीचा पहिला तास महत्त्वाचा असेल. आम्हाला माहित आहे की मजेदार गोष्टी घडू शकतात. जडेजाने खरोखरच चांगली गोलंदाजी केली, लेगवर्कने त्याला डाव्या हाताच्या फलंदाजाविरुद्ध मदत केली. तरीही वेगवान गोलंदाजांना विकेट मदत करेल असे वाटते.”

ऑस्ट्रेलियाने २९६ धावांची आघाडी घेतली –

सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ४ बाद १२३ धावा केल्या आहेत. याद्वारे कांगारू संघाने २९६ धावांची मजबूत आघाडी मिळवली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ajinkya rahanes finger injury has revealed whether he will play in the second innings or not in wtc final vbm

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×