आगरकरने स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर आपल्या आयपीएल संघाची निवड केली आहे. यामध्ये डेविड वॉर्नर आणि शिखर धवन यांची सलामीवीर म्हणून निवड केली आहे. तिसऱ्या क्रमांकावर त्यांनी इशान किशानला पसंती दिली आहे. तर चौथ्या स्थानावर सूर्यकुमार यादवची निवड केली आहे. पाचव्या स्थानावर आरसीबीचा धडाकेबाज फलंजलाज डिव्हिलिअर्सची निवड केली आहे. अष्टपैलू म्हणून हार्दिक पांड्या आणि स्टॉयनिस यांची निवड केली .
रबाडा आणि बुमराह यांच्यावर वेगवान गोलंदाजीची धुरा सोपवण्यात आली आहे. तर चहल आणि चक्रवर्ती यांच्यावर फिरकीची धुरा सोपवण्यात आली आहे.
आगरकरचा सर्वोत्तम आयपीएल संघ –
डेविड वॉर्नर, शिखर धवन, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, एबी डिविलियर्स, हार्दिक पांड्या, मार्कस स्टॉयनिस, जसप्रीत बुमराह, कगिसो रबाडा, युजवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती