Musheer Khan to Go on Australia Tour: भारतीय संघाला यंदा पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचं आहे. प्रसिद्ध बॉर्डर गावसकर ट्रॉफीचे सामने यंदा ऑस्ट्रेलियात खेळवले जाणार आहेत, ज्यामध्ये डे-नाईट कसोटीही खेळवली जाणार आहे. पण तत्पूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताचा अ संघ जाणार आहे. दुलीप ट्रॉफी आणि इराणी कपच्या धर्तीवर या संघासाठी खेळाडूंची निवड केली जाईल. मुंबईचा १९ वर्षीय युवा फलंदाज मुशीर खान या दौऱ्यावर जाणार हे निश्चित मानले जात आहे.

युवा अष्टपैलू खेळाडू मुशीर खानचा प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हंगाम उत्कृष्ट राहिला आहे. रणजी उपांत्यपूर्व फेरीत द्विशतक आणि अंतिम फेरीत शतक झळकावणाऱ्या मुशीर खानने दुलीप ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात शतक झळकावले. भारत अ विरुद्ध भारत ब संघाकडून खेळताना त्याने १८१ धावांची इनिंग खेळली. संघाने ९४ धावांवर ७ विकेट गमावल्या असताना ही खेळी त्याच्या बॅटमधून आली. याआधी मुशीरने अंडर-१९ वर्ल्ड कपमध्येही दोन शतके झळकावली होती.

हेही वाचा – Duleep Trophy 2024: दुलीप ट्रॉफीसाठी सुधारित संघांची घोषणा, नव्या १० खेळाडूंना संधी तर एका संघाचा कर्णधारही बदलला

मुशीर खान ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुशीर खान इंडिया ए संघाबरोबर ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. या दौऱ्यात तीन-चार दिवसांचे सामने खेळवले जाणार आहेत. मुशीरने अलीकडे देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप धावा केल्या आहेत. रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत त्याने मुंबईसाठी द्विशतक झळकावले. अंतिम सामन्यातही त्याने १३६ धावांची खेळी केली होती. त्याच्या पहिल्या प्रथम श्रेणी हंगामात त्याने तीन सामन्यांत ४३३ धावा केल्या.

दुलीप ट्रॉफीमध्ये भारत बी संघाकडून खेळताना त्याने पहिल्या डावात १८४ धावा केल्या होत्या. मुशीरने आपल्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले.

हेही वाचा – Babar Azam: ऐनवेळी पँट मिळाली नाही, बाबर आझम थेट टॉवेल गुंंडाळून आला; VIDEO व्हायरल

बीसीसीआयला तरुण खेळाडू तयार करायचे आहेत. याच कारणामुळे बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर मुशीरला ऑस्ट्रेलियाला पाठवू इच्छित आहेत. मुशीरशिवाय राजस्थानचा फिरकी गोलंदाज मानव सुथारलाही संधी मिळणार आहे. वृत्तानुसार, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांच्या जागी सुथारला नियुक्त केले जाणार आहे.