IND vs AUS Gautam Gambhir Press Conference Updates: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील अखेरच्या महत्त्वाच्या कसोटीपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. कसोटी मालिकेतील खेळाडूंची कामगिरी पाहता प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. पण तत्पूर्वी सिडनी कसोटीत भारतीय संघाला अजून एका बदलाला सामोर जावं लागणार आहे. भारताच्या प्लेईंग इलेव्हनबाबत बोलताना गंभीरने रोहितच्या खेळण्याबाबत संभ्रम व्यक्त केलाच पण अजून एक वेगवान गोलंदाज संघाबाहेर झाल्याची माहिती दिली.
भारताचा वेगवान गोलंदाज आकाशदीप गुरुवारी पाठीच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या पाचव्या आणि अंतिम कसोटीतून बाहेर पडला आहे. आकाश ब्रिस्बेन आणि मेलबर्न कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग होता आणि त्याच्या नावावर पाच विकेट्स होत्या. आकाशदीपने गोलंदाजी चांगली करत बुमराहला साथ देण्याचा प्रयत्न केला पण त्याची गोलंदाजी पाहता नशीबाने त्याला खूप कमी विकेट मिळाल्या. इतकंच नव्हे तर फलंदाजीतही त्याने चमकदार कामगिरी केली.
भारताचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सिडनी कसोटी सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले की आकाश दीप पाठीच्या समस्येमुळे संघाबाहेर झाला आहे. खेळपट्टी पाहून प्लेइंग इलेव्हन ठरवले जाईल, असे ते म्हणाले. २८ वर्षीय उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने दोन कसोटी सामन्यांमध्ये एकूण ८७.५ षटकं टाकली आणि हेच त्याच्या पाठीच्या दुखापतीचे कारण असू शकते.
ट
आकाशच्या जागी हर्षित राणा किंवा प्रसिद्ध कृष्णाचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत १-२ ने पिछाडीवर असून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी भारतीय संघाकडे ठेवण्यासाठी त्यांना पाचवा आणि अंतिम सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल.
ग
ऋषभ पंतला सिडनी कसोटीतून वगळण्याची शक्यता
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी निर्णायक वळणावर असून भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होऊ शकतात. पंतची जागाही धोक्यात आहे. बॉक्सिंग डे कसोटीत पहिल्या डावात स्कॉट बोलंडकडून चेंडू स्कूप करण्याच्या प्रयत्नात थर्ड-मॅनकडे झेलबाद झाल्याने त्याच्यावर टीका झाली. सुनील गावसकरांनीही त्याला मूर्ख म्हणत त्याला सुनावलं होतं. त्यानंतर दुसऱ्या डावात, भारत कसोटी अनिर्णित राहण्याच्या स्थितीत असताना, ट्रॅव्हिस हेडच्या गोलंदाजीवर तो डीप मिड-विकेटवर झेलबाद झाला, ज्यामुळे सामना ड्रॉ होण्याच्या आशाही मावळल्या.
© IE Online Media Services (P) Ltd