scorecardresearch

IND vs AUS Test Series: अक्षर पटेलने जसप्रीत बुमराहला टाकले मागे; बॉर्डर-गावसकर मालिकेत केला मोठा विक्रम

Akshar Patel surpassed Jasprit Bumrah: भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने बॉर्डर-गावसकर मालिकेत एक मोठा विक्रम केला आहे. त्याचबरोबर त्याने जसप्रीत बुमराहला देखील मागे टाकले आहे.

Ind vs Aus test series Updates Akshar Patel surpassed Jasprit Bumrah
अक्षर पटेल (फोटो-संग्रहित छायाचित्र लोकसत्ता)

IND vs AUS Test Series Updates: बॉर्डर-गासकर मालिकेत ऑस्ट्रेलियाचा २-१ असा पराभव करून टीम इंडियाने चौथ्यांदा विजेतेपद पटकावले. या मालिकेत टीम इंडियाच्या विजयाच्या हिरोबद्दल बोलताना अक्षर पटेलचे नावही विसरता येणार नाही. इंदोर कसोटी सोडून त्याने नागपूर, दिल्ली आणि अहमदाबाद कसोटीत फलंदाजीने संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. पण अहमदाबाद कसोटीच्या शेवटच्या दिवशी त्याने एक मोठी कामगिरी केली. बॉर्डर-गावसकर मालिकेत, जिथे फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व होते, अक्षरला संपूर्ण मालिकेत केवळ ३ विकेट घेता आल्या.

जसप्रीत बुमराहला मागे सोडले –

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५० विकेट्स घेण्याच्या बाबतीत अक्षर पटेलने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला मागे टाकले आहे. त्याने फक्त २,२०५ चेंडू टाकून ही कामगिरी केली. जी सर्वात वेगवान आहे. अहमदाबाद कसोटीत त्याने एकूण २ बळी घेतले. पण ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात ट्रॅव्हिस हेडची विकेट घेताच, तो सर्वात वेगवान ५० बळी घेणारा गोलंदाज ठरला. त्याने या प्रकरणात जसप्रीत बुमराहला मागे टाकले.

कसोटीत सर्वात वेगवान ५० बळी घेणारा गोलंदाज (चेंडूनुसार)

१. अक्षर पटेल – २,२०५
२. जसप्रीत बुमराह – २,४६५
३. करसन घावरी – २,५३४
४. रविचंद्रन अश्विन – २,५९७

बॉर्डर-गावसकर मालिकेत बॅटने धमाका –

बॉर्डर-गावसकर मालिकेबद्दल बोलायचे तर अक्षर पटेल गोलंदाजीत काही अप्रतिम करू शकला नसला, तरी फलंदाजीत त्याने कमाल केली. या मालिकेत भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा तो दुसऱ्या क्रमांकावर होता. त्याने चार सामन्यात एकूण २६४ धावा केल्या ज्यात ३ अर्धशतकांचा समावेश आहे. अक्षर पटेलच्या कसोटी क्रिकेटमधील आकडेवारीबद्दल सांगायचे तर, त्याने १२ कसोटी सामन्यांमध्ये २.२८ च्या उत्कृष्ट इकॉनॉमिसह ५० बळी घेतले आहेत. ७० धावांत ११ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने ५ वेळा ५ विकेट घेतल्या आहेत.

हेही वाचा – IND vs AUS ODI Series: पॅट कमिन्स वनडे मालिकेतून बाहेर; ‘हा’ खेळाडू पाच वर्षांनंतर संघाचे नेतृत्व करणार

कसोटी मालिकेनंतर दोन्ही संघात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या वनडे मालिकेला १७ मार्चपासून सुरुवात होणार आहे. तसेच या मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व पॅट कमिन्सऐवजी स्टिव्ह स्मिथ करणार आहे. त्याचबरोबर पहिल्या सामन्यात भारताचे नेतृत्व रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्या करणार आहे.

वनडे मालिकेसाठी संघ –

ऑस्ट्रेलिया संघ: स्टीव्ह स्मिथ (कर्णधार) शॉन अॅबॉट, अॅश्टन आगर, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर आणि अॅडम झाम्पा

टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-03-2023 at 14:34 IST