बर्मिगहॅम : आघाडीच्या भारतीय बॅडिमटनपटू सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांनी ऑल इंग्लंड खुल्या बॅडिमटन स्पर्धेतील आपल्या मोहिमेला विजयाने सुरुवात केली आहे.

बुधवारी महिला एकेरीच्या पहिल्या फेरीच्या लढतीत सायनाने स्पेनच्या बीएट्रीज कोरालेसला सरळ गेममध्ये पराभूत केले. सिंधूने देखील चीनच्या वांग झी यीविरुद्ध विजय नोंदवला. सायनाने स्पॅनिश प्रतिस्पर्धीला पहिल्या फेरीत ३८ मिनिटे चाललेल्या लढतीत २१-१७, २१-१९ असे पराभूत केले. सायनाने २०१५मध्ये या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. दुसरीकडे सिंधूने चीनच्या यी ला २१-१८, २१-१३ असे सरळ गेममध्ये नमवले.

Michael Vaughan Claims Rohit Sharma to join CSK next year
IPL 2024 : ‘पुढच्या वर्षी रोहित चेन्नईकडून खेळताना दिसणार…’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा मोठा दावा
d Gukesh defeated Nijat Abasov in the Candidates chess tournament sport news
गुकेश संयुक्त आघाडीवर! पाचव्या फेरीत अबासोववर मात; अन्य भारतीयांच्या लढती बरोबरीत
Rohit breaks Dhoni's sixes record
IPL 2024 MI vs DC : रोहित शर्माने मोडला धोनीचा विक्रम! वॉर्नर-कोहलीच्या ‘या’ खास क्लबमध्येही झाला सामील
hardik pandya
हार्दिकच्या योजनांचे आश्चर्य! बुमराच्या वापरावरून स्मिथकडून मुंबई इंडियन्सच्या कर्णधारावर टीका

पुरुष एकेरीत भारताच्या बी. साईप्रणीतला अव्वल मानांकित व्हिक्टर अ‍ॅक्सेलसनकडून २०-२२, ११-२१ असे पहिल्या फेरीत पराभूत व्हावे लागले. एच. एच. प्रणॉयला कुणलावूत वितिदसरनने १५-२१, २२-२४ असे नमवले.

सात्विक- चिराग जोडीची आगेकूच

पुरुष दुहेरीत पाचव्या मानांकित सात्विकसाइराज रंकीरेडडी आणि चिराग शेट्टी जोडीने स्कॉटलंडच्या अलेक्झांडर डून आणि एडम हॉल या जोडीला २१-१७, २१-१९ असे पराभूत केले. महिला दुहेरीत त्रिसा जॉली आणि पुलेला गायत्री गोपीचंद यांनी थायलंडच्या जोडीला १७-२१, २२-२०, २१-१४ असे नमवले.